8 January 2025 4:54 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज फर्म बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर बुलेट ट्रेनच्या स्पीडने परतावा देणार - NSE: RVNL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: TATATECH Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE Gold Rate Today | आज सोन्याचा भाव मजबूत महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या NTPC Share Price | एनटीपीसी शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NTPC Bonus Share News | ही कंपनी 1 शेअरवर 4 फ्री बोनस शेअर्स देणार, खरेदीला गर्दी, यापूर्वी 4000% परतावा दिला - NSE: JINDWORLD
x

कोरोनाने देश हादरणार | गेल्या २४ तासात ९५,७३५ नवे कोरोना रुग्ण

India, Covid 19, Corona Virus

नवी दिल्ली, १० सप्टेंबर : देशातील कोरोनाबाधितांची संख्या आता 44 लाखांच्या घरात गेली आहे. गेल्या 24 तासांत रेकॉर्ड ब्रेक 95 हजार 735 नवीन रुग्ण सापडले. आतापर्यंत एका दिवसात सापडलेल्या कोरोना रुग्णांचा हा आकडा सर्वात जास्त आहे. याआधी 6 सप्टेंबर रोजी 93 हजार 723 कोरोना रुग्ण सापडले होते. तर एका दिवसात 1172 जणांचा मृत्यू झाला. यासह एकूण मृतांची संख्या 75 हजार 62 झाली आहे.

यात दिलासादायक बाब म्हणजे भारत हा जगातला दुसरा देश ठरला आहे, जेथे सर्वात जास्त रुग्ण निरोगी झाले आहेत. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या आकडेवारीनुसार देशात 34 लाख 71 हजार 784 रुग्ण निरोगी झाले आहेत. भारताचा रिकव्हरी रेट 77.74% आहे. असे असले तरी देशात अजूनही 9 लाख 19 हजार 18 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

दुसरीकडे राज्यातील करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून बुधवारी २३ हजार ८१६ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर १३ हजार ९०६ रुग्ण बरे होऊन घरी परतले असून २४ तासांत ३२५ करोनाबाधितांचा मृत्यू झाला. राज्यात आजपर्यंत तपासण्यात आालेल्या ४८ लाख ८३ हजार नमुन्यांपैकी ९ लाख ६७ हजार ३४९ (१९.८१ टक्के) जण करोनाबाधित असल्याचे आढळून आले आहेत, तर आतापर्यंत ६ लाख ८६ हजार ४६२ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७०.९६ टक्यांवर पोहोचले आहे. राज्यात १६ लाख ११ हजार २८० व्यक्ती घरगुती अलगीकरणामध्ये, तर ३७,६४४ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत. राज्यात सर्वाधिक ६५ हजार ३६१ करोनाबाधित पुणे जिल्ह्य़ात आहेत.

 

News English Summary: India has, over the past few weeks, seen a constant spike in the number of coronavirus disease (Covid-19)cases recorded in a single day. From around 75,000 in late August, the country is now recording more cases in 24 hours than the infection count of some of the worst-hit countries. On Wednesday, India recorded nearly 90,000 new cases and 1,115 deaths due to Covid-19, taking the tally and death toll to 4,370,129 and 73,890 respectively.

News English Title: Single Day Spike Of 95735 New Cases And 1172 Deaths Reported In India In The Last 24 Hours Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x