23 April 2025 1:39 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | शेअर असावा तर असा, तब्बल 1,33,786 टक्के परतावा, संयम पळणारे श्रीमंत झाले - NSE: BEL Bonus Share News | अशी संधी सोडू नका, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: UEL Horoscope Today | 23 एप्रिल 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या IRB Share Price | आयआरबी शेअर्स गुंतवणूकदारांसाठी महत्वाची अपडेट, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: IRB Reliance Power Share Price | शेअर प्राईस 43 रुपये; रिलायन्स पॉवर शेअर्सबाबत फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Apollo Micro Systems Share Price | तगडा परतावा मिळेल, हा डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार - NSE: APOLLO Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार बुधवार 23 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

कर्नाटकमधील भाजपच्या मंत्र्याची थेट ‘गोध्रा’सारख्या परिस्थितीची धमकी

Godhra, CAA 2019

बंगळुरू: कर्नाटकातील काँग्रेस नेते यु. टी. खादेर यांनी म्हटलं होतं की, “जर सुधारित नागरिकत्व कायदा राज्यात लागू झाला तर कर्नाटक जळेल.” खादेर यांच्या या विधानावर प्रत्युत्तर देताना मंत्री रावी यांनी म्हटलं, “जर बहुसंख्याकांचा संयम सुटला तर गोध्रा सारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते”.

दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस बी. एल. संतोष यांनी मंगळूरू येथे पोलिसांच्या गोळीबारात दोन आंदोलकांच्या झालेल्या मृत्यूला खादेर यांना जबाबदार धरले आहे. ‘द हिंदू’ने याबाबत वृत्त दिले आहे. बहुसंख्यांक शांत आहेत. त्यामुळे तुम्ही सगळ्या भागांमध्ये स्फोटक परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहात, अशा शब्दांमध्ये रवी यांनी विरोधकांना अप्रत्यक्षपणे लक्ष्य केलं. परिस्थिती चिघळवू पाहणाऱ्यांना त्यांनी यावेळी थेट इशारा दिला. बहुसंख्यांकांनी संयम राखला आहे म्हणून तुम्ही वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करत आहात. तुम्ही जरा मागे वळून पाहावं असा सल्ला मी देईन.

गोध्र्यातील घटना आठवून पाहिल्यास आमचा संयम संपल्यावर काय होतं ते तुम्हाला कळेल. आमच्या संयमाला आमचा कमकुवतपणा समजू नका. तुम्ही राज्यातील सार्वजनिक संपत्तीचं कसं नुकसान करत आहात आणि परिस्थिती स्फोटक करण्याचा प्रयत्न तुमच्याकडून कशा पद्धतीनं सुरू आहे, हे आम्ही पाहत आहोत, असं रवी म्हणाले.

 

Web Title:  Situation Like Gujarat Godhra May Arise if Majority lose Patience says Karnataka State Minister.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या