8 January 2025 5:37 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज फर्म बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर बुलेट ट्रेनच्या स्पीडने परतावा देणार - NSE: RVNL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: TATATECH Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE Gold Rate Today | आज सोन्याचा भाव मजबूत महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या NTPC Share Price | एनटीपीसी शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NTPC Bonus Share News | ही कंपनी 1 शेअरवर 4 फ्री बोनस शेअर्स देणार, खरेदीला गर्दी, यापूर्वी 4000% परतावा दिला - NSE: JINDWORLD
x

असं असेल तर पुढीलवेळी अर्णबला मुलाखत देण्याऐवजी रविश कुमार यांना मुलाखत देऊन बघा

Kunal Kamra, Narendra Modi

मुंबई, ८ एप्रिल: ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसोबत संवाद साधला. परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी कशी करावी, ताण-तणाव कसा दूर करावा यासंदर्भात महत्वाच्या सूचना देतात. परीक्षा पे चर्चा 2021 या कार्यक्रमासाठी रजिस्ट्रेशनची सुविधा 14 मार्च 2021 पर्यंत पूर्ण झाली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, परीक्षा पे चर्चा 2021 या कार्यक्रमासाठी 9 लाखांहून अधिक विद्यार्थी, 2 लाखांहून अधिक शिक्षक आणि एक लाखांहून अधिक पालकांचा समावेश होता.

दरम्यान, ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमावरून पुन्हा एकदा कामराने एक ट्विट करत पंतप्रधान मोदींवर नाव न घेता निशाणा साधला आहे. ‘परीक्षा पे चर्चा २०२१’ हा कार्यक्रम पंतप्रधान आणि पंतप्रधान कार्यालयाच्या सर्व समाजमाध्यमांवर थेट प्रसारित करण्यात आला. या कार्यक्रमासाठी १३ लाखांहून अधिक शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांनी नोंदणी केली होती. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी प्रथमच सर्व जगातील इच्छुकांना निमंत्रित करण्यात आले होते.

जे आवडते ते आपण आधी करतो, विद्यार्थी सहज, सोप्या आणि त्यांना आवडणाऱ्या विषयाचा जास्त अभ्यास करतात आणि कठीण विषयाला घाबरतात. उलट कठीण गोष्टींना आधी सामोरे जा. परीक्षेत असे म्हटले जाते की सोपे आधी सोडवा, पण मी तर म्हणेन जे कठीण आहे त्याचा निपटारा सर्वात आधी करायला हवा, असे मोदी म्हणाले होते. यावर, असे असेल तर पुढीलवेळी अर्णब गोस्वामीला मुलाखत देण्याऐवजी रविश कुमार यांना मुलाखत देण्याचा प्रयत्न करुन बघावा, असे खोचक ट्विट कुणाल कामराने केले आहे.

 

News English Summary: Once again, Kamra tweeted from the ‘Pariksha Pay Charcha’ program and targeted Prime Minister Modi without naming him. The program ‘Pariksha Pay Charcha 2021’ was broadcast live on all social media of the Prime Minister and the Prime Minister’s Office. More than 13 lakh teachers, students and parents had registered for the event. For the first time, aspirants from all over the world were invited to participate in the event.

News English Title: So next time Arnab ko interview dene se pahle Ravish ko dene ka attempt karna said Kunal Kamra news updates.

हॅशटॅग्स

#KunalKamra(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x