परदेशी महिलेच्या पोटी जन्मलेली व्यक्ती देशभक्त असू शकत नाही - प्रज्ञासिंह ठाकूर
नवी दिल्ली, २९ जून : परदेशी महिलेल्या पोटी जन्माला आलेली व्यक्ती देशभक्त असूच शकत नाही, असा टोला साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी काँग्रेसला लगावला आहे. यामुळे नव्या राजकीय वादाला तोंड फुटले आहे. साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी रविवारी भोपाळमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना हे वक्तव्य केले. साध्वी प्रज्ञा यांनी म्हटले की, काँग्रेसने आत्मपरीक्षण केले पाहिजे. त्यांच्या पक्षातील लोकांकडे कशाप्रकारे बोलावे याची सभ्यता नाही. तसेच त्यांच्याकडे संस्कार आणि देशभक्तीही नाही. मुळात दोन देशांचे नागरिकत्व असणाऱ्यांच्या अंगात देशभक्ती कुठून येणार? चाणक्याने म्हटले होते की, या भूमीतील सुपुत्रच देशाचे रक्षण करु शकतो. परदेशी महिलेल्या पोटी जन्माला आलेली व्यक्ती देशभक्त असूच शकत नाही, असे साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी म्हटले होते.
प्रज्ञासिंह ठाकूर यांनी यावेळी राहुल गांधींसोबत सोनिया गांधी यांच्यावरही निशाणा साधला. “काँग्रेसमध्ये ना सभ्यता आहे ना संस्कार आहेत. दोन देशांचं नागरिकत्व असलेल्यांकडून आपण देशभक्तीची अपेक्षा करु शकत नाही,” असं त्यांनी म्हटलं आहे. प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या वक्तव्यावर काँग्रेसनेही प्रतिक्रिया दिली आहे. मध्य प्रदेश काँगेस प्रवक्ता जे पनी धनोपिया यांनी प्रज्ञासिंह ठाकूर यांचा मानसिक तोल ढासळला असल्याचं म्हटलं आहे. तसंच भाजपा नेत्यांनी त्यांच्यावर उपचार केले पाहिजेत असा सल्लाही दिला आहे.
प्रज्ञा सिंह या 2008 मधील मालेगाव बॉम्बस्फोट प्रकारातील आरोपी असून त्या सध्या जामिनावर बाहेर आहेत. लोकसभा निवडणुकीदरम्यान प्रज्ञा सिंह यांनी अनेकदा वादग्रस्त विधाने केली होती. महात्मा गांधींची हत्या करणारा नथुराम गोडसे देशभक्त होता. मी त्यांना राष्ट्रवादी मानते, असे त्या म्हणाल्या होत्या. 26/11 हल्ल्यात शहीद झालेले दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे माझ्या शापाने मरण पावले, असे देखील त्या म्हणाल्या होत्या. या दोन्ही विधानांमुळे ठाकूर यांनी पक्षाला अडचणीत आणले होते.
News English Summary: Sadhvi Pragya Singh Thakur has told the Congress that a person born to a foreign woman cannot be a patriot. This has sparked a new political controversy. Sadhvi Pragya Singh Thakur made this statement while talking to media in Bhopal on Sunday.
News English Title: Son Of A Foreigner Cant Be A Patriot Says Bjp Mp Pragya Thakur Hits Out At Rahul Gandhi News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- Smart Investment | नवीन वर्षात करा करोडपती बनण्याचा संकल्प करा, दररोज 10 रुपये वाचवून व्हाल मालामाल
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 35 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: IRFC
- Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेजचा सल्ला, स्टॉक BUY करावा का - NSE: JIOFIN