16 April 2025 7:46 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 17 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA Suzlon Share Price | 54 रुपयांचा शेअर पुढे किती फायद्याचा? गुंतवणूकदारांसाठी अपडेट, फायदा की नुकसान? - NSE: SUZLON Tata Steel Share Price | 180 रुपये टार्गेट प्राईस, बिनधास्त खरेदी करा, ब्रोकरेजकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL
x

देशावरील संकटांसाठी एनडीए सरकारची चुकीची धोरणं व भोंगळ कारभार जबाबदार - सोनिया गांधी

Sonia Gandhi, PM Narendra Modi, India China

नवी दिल्ली, २३ जून : व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज काँग्रेस कार्यकारिणी समितीची बैठक घेतली. भारतीय सीमांवर निर्माण झालेल्या तणावासाठी मोदी सरकार जबाबदार आहे. चुकीची धोरणे आणि भोंगळ कारभार सीमेवरील तणावाचे मूळ असल्याची टीका सोनिया गांधी यांनी केली.

सोनिया गांधी म्हणाल्या की, नियंत्रण रेषेवर चीनसोबत तणाव सुरु आहे. भविष्यात काय होईल हे सांगता येत नाही पण आपली परिपक्व मुत्सद्देगिरी आणि निर्णायक नेतृत्त्व आपल्या प्रादेशिक अखंडतेचं संरक्षण करताना काय केलं जातयं याची माहिती देईल अशी अपेक्षा आहे, असे सोनिया गांधींनी यावेळी सांगितले.

“देश आज आर्थिक संकट आणि महामारीचा सामना करत आहे. यादरम्यान भारत-चीन सीमेवर झालेल्या चकमकीमुळे देशात तणाव आहे. या दोन्ही संकटांसाठी एनडीए सरकारचे चुकीचे निर्णय आणि धोरणं कारणीभूत आहेत” असं सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे. तसेच इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे. सातत्याने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होत आहे. इंधन दरवाढ सुरू असल्यावरून देखील सोनिया गांधी यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं. सरकार पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढवून लोकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम करत असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.

 

News English Summary: Congress President Sonia Gandhi today convened a meeting of the Congress Executive Committee through video conferencing. The Modi government is responsible for the tension on the Indian border. Sonia Gandhi criticized the wrong policies and mismanagement as the root cause of border tensions.

News English Title: Sonia Gandhi criticized the wrong policies and mismanagement as the root cause of border tensions News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#SoniaGandhi(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या