22 January 2025 4:41 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनी शेअरमध्ये तेजीचे संकेत, रेटिंग अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Rama Steel Share Price | 65 पैशाचा शेअर श्रीमंत करतोय, डिफेन्स क्षेत्रातही प्रवेश, यापूर्वी 1748% परतावा दिला - NSE: RAMASTEEL Bonus Share News | फ्री बोनस शेअर्स देतेय ही कंपनी, संधी सोडू नका, 4085 टक्के परतावा दिला शेअरने - BOM: 531771 NTPC Share Price | एनटीपीसी शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, मजबूत परतावा मिळेल - NSE: NTPC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Top Up SIP | पगारदारांनो SIP गुंतवणूक नाही तर Top Up SIP करून बंपर परतावा मिळवा, पैशांचा पाऊस पडेल Jio Finance Share Price | नव्या व्यवसायात जिओ फायनान्शियल कंपनीचा प्रवेश, तज्ज्ञांचा शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN
x

हैदराबादमधून हटियासाठी पहिली विशेष रेल्वे गाडी सोडण्याचा निर्णय: ANI वृत्त

Lockdown, Migrant labours, Telangana Special Train

हैदराबाद, १ मे: देशातील कोरोनाबाधितांची संख्या ३४ हजार ७८० वर पोहोचली आहे. त्यातील ९०६८ जण बरे झाले असून बुधवारी ६३० जण कोरोनामुक्त झाले. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण १४ दिवसांमध्ये १३.२४ टक्क्यांवरून २५.१९ वर गेले आहे. देशाचा रुग्ण दुप्पट होण्याचा सरासरी वेग ३.४ वरून ११ दिवसांवर आला आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावाधी वाढल्याने आरोग्य यंत्रणांना मोठा दिलासा मिळाला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी दिली.

दरम्यान, कोरोना विषाणूचा प्रकोप काही राज्यांमध्ये थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. या विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन लावून लोकांना घरातच राहण्यासाठी आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले. परंतु, देशातील वेगवेगळ्या भागात स्थलांतरित मजूर एकत्र आल्याची छायाचित्रे चिंता वाढवणारी ठरत आहेत. तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये मंगळवारी सुमारे २४०० मजुरांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केल्याचे समोर आले होते.

मात्र आता केंद्रीय गृहमंत्रालयाने या कामगारांना त्यांच्या मूळ घरी पोहोचण्याचे मार्ग काही अटींवर खुले केले असून त्याची देशभर अंमलबजावणी सुरु झाली आहे. तेलंगण सरकारने केलेल्या विनंतीनंतर केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने हैदराबादमधून हटियासाठी विशेष रेल्वे गाडी सोडण्याचा निर्णय घेतल्याचे एएनआयने म्हटलं आहे.

रेल्वे मंत्रालयाच्या निर्देशनानुसार झारखंडमधील कामगारांना त्यांच्या राज्यात जाता यावे म्हणून ही विशेष रेल्वे सोडण्यात आली. या रेल्वेला निरोप देण्यासाठी काही रेल्वेचे अधिकारी आणि पोलीस अधिकारी लिंगपपिल्ली स्थनकावर उपस्थित होते. महिन्याभराहून अधिक काल लॉकडाउनमध्ये घालवल्यानंतर अखेर आपल्या राज्यात परत जातानाचा आनंद कामगारांच्या चेहऱ्यावर दिसत होता.

 

News English Summary: The Union Home Ministry has opened the way for these workers to reach their original homes on certain conditions and its implementation has started across the country. According to ANI, the Union Railway Ministry has decided to launch a special train from Hyderabad to Hatia following a request from the Telangana government.

News English Title: Special train was run today from Lingampalli Hyderabad to Hatia Jharkhand on request of Telangana government directions of Railway Ministry News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x