कर्नाटकात KG ते इयत्ता ५'वीपर्यंतच्या ऑनलाईन शिक्षणावर बंदी
बंगळुरू, ११ जून: एकिकडे कोरोना विषाणूमुळं देशाच्या अर्थव्यवस्थेपासून थेट शिक्षण व्यवस्थेपर्यंत थेट परिणाम होत असतानाच दुसरीकडे या परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी म्हणून बहुविध मार्ग अवलंबले जात आहेत. शिक्षण व्यवस्थेच्या बाबतीत सांगावं तर, विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये आणि त्यांचं शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये यासाठी अनेक राज्यांनी ऑनलाईऩ शिक्षण पद्धतीला प्राधान्य दिलं आहे. पण, एका राज्यानं मात्र शिशूवर्गापासून ते इयत्ता पाचवीपर्यंतच्या ऑनलाईन शिक्षणावर बंदी आणण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
अनेक पालक, शिक्षक आणि विद्यार्थी जे गेल्या काही दिवसांपासून सध्याच्या घडीला अनेकांसाठी सवयीच्या झालेल्या या ऑनलाईन शिक्षण पद्धतीशी ताळमेळ साधण्याच्या प्रयत्नांत आहेत, काही अडचणींचा सामनाही करत आहेत त्यांच्या दृष्टीनं हा अतिशय महत्त्वाचा निर्णय ठरत आहे. कर्नाटक प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मंडळानं बुधवारी इयत्ता पाचवीपर्यंतच्या ऑनलाईन शिक्षणावरील बंदीचे आदेश दिले. NIMHANS च्या अहवालानुसार आणि काही पालकांच्या तक्रारीच्या आधारे किंडर गार्डनपासूनच्या या विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणींचा आढावा घेत अखेर शिक्षण विभागाकडून तातडीनं हा महत्त्वाचा निर्णय घेतला गेला.
दुसरीकडे महाराष्ट्रात अडीच महिन्यांपासून शाळा आणि महाविद्यालयेही बंद आहेत. अर्थात शाळा कधी उघडणार याबाबत विद्यार्थी आणि पालकांमध्ये चिंता आहे. मात्र लॉकडाऊन काळात विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये, या पार्श्वभूमीवर दूरदर्शनवरून इयत्ता पहिली ते इयत्ता बारावीच्या अभ्यासक्रमाबाबत कार्यक्रम प्रसारित करण्यात येणार आहेत. आजपासून या कार्यक्रमांना सुरुवात होणार आहे.
दरम्यान, शासनाकडून इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतची सर्व पुस्तके पीडीएफ स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्यामुळे घरबसल्या विद्यार्थ्यांना अभ्यास करता येणार आहे. ऑनलाईन पुस्तके डाऊनलोड करण्याचा पर्याय देखील देण्यात आला आहे.
News English Summary: The Karnataka Board of Primary and Secondary Education on Wednesday ordered a ban on online education up to Class V. According to the report of NIMHANS and based on the complaints of some parents, after reviewing the problems faced by these students from Kinder Garden, this important decision was taken immediately by the Department of Education.
News English Title: State government of Karnataka bans online education for children from KG to 5th standard News latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा
- HAL Share Price | मल्टिबॅगर HAL सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 57 टक्केपर्यंत परतावा - NSE: HAL
- Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर नीचांकी पातळीवर, चार्टवर ओव्हरसोल्ड, BUY करावा की SELL - NSE: TATATECH
- LPG Gas New Connection | एलपीजी गॅस कनेक्शन योजनेसह मिळेल 450 रुपयांच्या गॅस सिलेंडरचं कनेक्शन, कसा अप्लाय करा
- Cochin Shipyard Share Price | PSU कोचीन शिपयार्ड शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट - NSE: COCHINSHIP
- Tata Technologies Share Price | टाटा ग्रुपचा शेअर 30 टक्क्यांनी स्वस्त मिळतोय, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH
- Saving on Salary | महागाई डोईजड होणार, महिना खर्च भागवण्यासाठी हा फॉम्युला फॉलो करा, 2 कोटी 70 लाख रुपये मिळतील
- IRFC Share Price | आयआरएफसी शेअर बुलेट ट्रेनच्या गतीने मालामाल करणार, स्टॉक ब्रेकआऊट देणार, टार्गेट नोट करा - NSE: IRFC