15 January 2025 11:37 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरबाबत मोठे संकेत, तज्ज्ञांकडून SELL रेटिंग, नेमकं कारण काय - NSE: NTPCGREEN HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना
x

परीक्षा रद्द करण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही, अधिकार फक्त UGC'ला

UGC, CBSE Exam, ICSE Exam, SSC Board, HSC Board

मुंबई, २५ जुलै : परीक्षा रद्द करण्याचा राज्य सरकारचा निर्णय म्हणजे आमच्या वैधानिक अधिकारावरील अतिक्रमण असल्याचा दावाही ‘यूजीसी’ने केला आहे. विद्यापीठाच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा रद्द करण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही तर आम्हाला आहे. विशेष काद्याने हा अधिकार आम्हाला बहाल केलेला आहे अशी भूमिका यूजीसीने शुक्रवारी उच्च न्यायालयात मांडली. निवृत्त शिक्षक धनंजय कुलकर्णी यांनी विद्यापीठाच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा रद्द करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला कोर्टात आव्हान दिले होते.

दरम्यान, उच्च शिक्षणाच्या दर्जाचे मानांकन ठरवणे आणि त्याप्रमाणे योग्य तो निर्णय घेण्याचा कायदेशीर अधिकार केवळ संसदेला आहे. संसदेने विशेष कायद्याद्वारे हा अधिकार ‘यूजीसी’ला दिला आहे. त्यामुळेच परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेऊन राज्य सरकार आपल्या वैधानिक अधिकारांवर अतिक्रमण करत असल्याचा दावा ‘यूजीसी’ने केला आहे. याशिवाय राज्य सरकारचा निर्णय हा देशातील उच्च शिक्षणाच्या दर्जावर विपरीत परिणाम करणारा आहे, असेही ‘यूजीसी’ने म्हटले आहे. याशिवाय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य, करिअर, जगभरातील संधी लक्षात घेऊन परीक्षा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असेही ‘यूजीसी’ने म्हटले आहे.

या सर्व बाबींचा विचार करता राज्य सरकारचा निर्णय ‘यूजीसी’ने २९ एप्रिल आणि ६ जुलै रोजी परीक्षा घेण्याबाबत जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांच्या विसंगत आहे, असेही ‘यूजीसी’ने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. ‘यूजीसी’ने ६ जुलै रोजी अंतिम वर्षांच्या परीक्षांबाबत सुधारित मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. त्यात त्यांनी विद्यापीठ आणि शैक्षणिक संस्थांना सप्टेंबर अखेरपर्यंत परीक्षा घेण्याच्या सूचना केल्या होत्या. या परीक्षा ऑनलाइन की ऑफलाइन, याचा निर्णय ‘यूजीसी’ने विद्यापीठांवर सोपवला होता.

 

News English Summary: The UGC also claimed that the state government’s decision to cancel the exam was an encroachment on our statutory rights. We have the right to cancel the final year exams of the university, not the state government.

News English Title: State governments has no right to cancel final year exams says UGC News Latest Updates.

हॅशटॅग्स

#UGC(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x