24 November 2024 1:44 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

'मी पुन्हा येऊ शकतो' या स्वप्नात शहांकडे सेनेच्या 2 नेत्यांची नावं दिल्याची शक्यता?

Devendra Fadnavis, Amit Shah, Sachin Vaze case

मुंबई, १८ मार्च: NIA बुधवारी रात्री निलंबित केलेले पोलिस अधिकारी (API) सचिन वाझेंना ठाण्यात घेऊन गेले. तिथे अनेक ठिकाणी सीन रिक्रिएशन करण्यात आले. रात्री उशीरा NIA च्या दोन टीमने वझेंच्या घराची झाडाझडती घेतली. यामध्ये अनेक कागदपत्रे ताब्यात घेण्यात आले आहेत. त्यांच्या सोसायटीच्या लोकांचीही चौकशी करण्यात आली.

दरम्यान, सुशांतसिंग राजपूत, कंगना रानौत, अर्णब गोस्वामी अटक प्रकरणांनंतर फडणवीसांना सचिन वाझे प्रकरणी ‘मी पुन्हा येऊ शकतो’ अशी स्वप्नं पडू लागल्याची चर्चा राजकीय क्षेत्रात रंगली आहे. त्याचाच भाग म्हणजे राजधानी दिल्लीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीच्या वेळी मनसुख हिरेन हत्या प्रकरणाची चौकशी एनआआए मार्फत करण्यासंदर्भात मागणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवसेनेतील एका मंत्र्याला अनेक आमदारांचा पाठिंबा आहे आणि त्यामुळे त्यालाच रडारवर घेता येईल का याची दिल्लीत चाचपणी ते करत आहेत अशी दिल्लीत चर्चा रंगली आहे. यावेळी त्यांनी शिवसेनेच्या दोन मोठ्या नेत्यांची नावं अमित शहा यांना दिली आहेत.

बुधवारी नवी दिल्ली इथं घेतलेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं नाव घेत सचिन वाझे याच्याबाबत गंभीर आरोप केले आहेत. ‘वसुलीच्या रॅकेटमध्ये सचिन वाझे यांचं नाव आलं होतं. अशा स्थितीतही मी मुख्यमंत्रिपदी असताना सचिन वाझे यांची पुन्हा नियुक्ती व्हावी यासाठी उद्धव ठाकरे हे माझ्यासोबत बोलले होते. त्यांना पुन्हा सेवेत घेण्यास माझा विरोध होता,’ असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.

शिवसेनेसोबत सचिन वाझे याचे अतिशय जवळेचे संबंध होते. एवढंच नाही तर अनेक नेत्यांसोबत त्याचे व्यवसायिक संबंध होते. हे सर्व सचिन वाझे एकटा करू शकत नाही. त्यामुळे त्यांच्यासोबत काही जण आहेत. हे एका पोलीस अधिकाऱ्याचं काम नाही, तर सरकारची जबाबदारी आहे. या प्रकरणाच्या मूळापर्यंत जाण्याची आवश्यकता आहे,’ असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

 

News English Summary: Opposition leader Devendra Fadnavis called on Union Home Minister Amit Shah in Delhi today. During the visit, sources said that they had demanded an inquiry into the Mansukh Hiren murder case through the NIA.

News English Title: State opposition leader Devendra Fadnavis meet Amit Shah over Sachin Vaze case news updates.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x