21 November 2024 11:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसच्या १९ आमदारांचे राजीनामे

Governor Lalji Tandon, Madhya Pradesh, Jyotiraditya Scindia resing, CM Kamal nath

भोपाळ: काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी आपल्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर मध्य प्रदेशमध्ये पुन्हा एकदा राजकीय हालचालींना वेग मिळाला. मध्य प्रदेशमध्ये सहा मंत्र्यांसह एकूण १९ आमदारांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांच्याकडे राजीनामा पाठविण्यात आला आहे. राजभवनाकडून याला दुजोरा देण्यात आला. लालजी टंडन हे होळीनिमित्त मंगळवारी लखनऊमध्ये आहेत.

काँग्रेस पक्षाचे नाराज नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे सुपूर्द केला आहे. मध्य प्रदेश काँग्रेसला हा सर्वात मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. आपल्या राजीनाम्यानंतर शिंदे भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असून उद्या भोपाळमधून राज्यसभेचे उमेदवार म्हणून आपला अर्ज भरणार आहेत.

दिल्लीतून तातडीने भोपाळमध्ये दाखल झालेले मुख्यमंत्री कमलनाथ हे डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न करत आहेत. मात्र परिस्थिती त्यांच्या हाताबाहेर गेल्याचा अंदाज राजकीय क्षेत्रात व्यक्त केला जात आहे. त्यामुळे मध्यप्रदेशात कमळ फुलणार असल्याचं संकेत मिळत आहे. मागील काही महिन्यांपासून नाराज असलेले काँग्रेसचे दिग्गज नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना त्यांनी राजीनामा पाठवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर त्यांनी हा मोठा निर्णय घेतला. देशभर रंगोत्सवाची धूम असताना दिल्लीत राजकीय वातावरण तापलं आहे. मध्यप्रदेशातल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला मोठा हादरा बसण्याची शक्यता आहे.

 

News English Summery: After the Congress leader Jyotiraditya Shinde resigned his party membership, political movements in Madhya Pradesh were once again accelerated. In Madhya Pradesh, a total of 19 MLAs, including six ministers, have resigned. Madhya Pradesh Governor Lalji Tandon has resigned. This was confirmed by the Raj Bhavan. Lalji Tandon is in Lucknow on Tuesday for Holi.

 

Web News Title: Story 19 congress MLA including 6 ministers have sent their resignation letters to Governor Lalji Tandon.

हॅशटॅग्स

#Congress(527)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x