5 November 2024 8:49 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | डिफेन्स कंपनीबाबत फायद्याची अपडेट, मल्टिबॅगर शेअर फोकसमध्ये, तुफान तेजीचे संकेत - NSE: BEL Penny Stocks | चिल्लर प्राईस पेनी शेअर श्रीमंत करणार, 30 दिवसात 103% परतावा दिला, स्टॉक खरेदीला गर्दी - Penny Stocks 2024 HUDCO Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, HUDCO शेअर फोकसमध्ये, मिळेल 65% परतावा - NSE: HUDCO RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, पुन्हा तेजीचे संकेत - NSE: RVNL SJVN Share Price | SJVN शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL
x

थाळ्या-टाळ्या वाजवूनही परिस्थिती गंभीर; 'डिजिटल' मंत्र्यांना हजर होण्याचे केंद्राचे आदेश

Covid19, Corona Crisis, Corona Virus

नवी दिल्ली, १३ एप्रिल : आज देशव्यापी लॉकडाउनचा २० वा दिवस असून देशभरातील रुग्णांची संख्या वाढत आहे. देशभरात रुग्णांची संख्या ९,००० वर पोहोचली असून आतापर्यंत ३०० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. भारतात सोमवारपर्यंत कोरोना विषाणूची बाधा होऊन ३०८ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांत भारतात ३५ जण मृत्युमुखी पडल्याची नोंद झाली आहे. तर ६२० नव्या रुग्णांची नोंद झाली आहे, त्यामुळे आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार भारतात रुग्णांची संख्या ही ९ हजार १५२ वर पोहोचली आहे.

दरम्यान केंद्र सरकारने आपले मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना मंत्रालयात आपापले कामकाज संभाळण्याचे आदेश दिले आहेत.केंद्र सरकारने काही मंत्री आणि अधिकाऱ्यांना कामावर रुजू होण्याचे आदेश दिले आहेत. ज्यांच्याकडे वाहने आहेत आणि दिल्ली परिसरात राहतात असे मंत्री आणि अधिका-यांना कार्यालयात येऊन काम करण्यास सांगितले आहे.

केंद्रीय मंत्री पण आपल्या कार्यालयात कामावर येत आहेत. केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशाचे पालन केले जात असल्याचे केंद्रीय पर्यटन मंत्री प्रल्हाद पटेल यांनी प्रसार माध्यमांना सांगितले. केंद्र सरकारचे सर्व मंत्री आजपासून मंत्रालयात आपापले कामकाज संभाळतील. काम करताना सर्वांना सोशल डिस्टंसिंग पाळण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

 

News English Summary: Today is the 20th day of a nationwide lockdown, and the number of patients across the country is increasing. The number of patients has reached 9,000 across the country and 300 patients have died so far. In India, 308 people have died of Corona virus till Monday. In the last 24 hours, 35 people have been reported dead in India. According to the Health Ministry data, the number of patients in India has reached 9,152.

News English Title: Story after increasing tension in the Nation central government call all cabinet minister to join the office Covid19 News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x