15 November 2024 5:34 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया पेनी शेअरला नोमुरा ब्रोकरेजकडून BUY रेटिंग, मिळेल 90% परतावा - NSE: IDEA GMP IPO | स्वस्त IPO आला रे, मजबूत कमाईची मोठी संधी, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल - IPO GMP NHPC Share Price | मल्टिबॅगर NHPC शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 5 मेटल शेअर्स मालामाल करणार, 46% पर्यंत परतावा मिळेल - NSE: TATASTEEL Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून रेटिंग अपडेट - NSE: SUZLON IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागणार, ग्रे-मार्केटमधून फायद्याचे संकेत - GMP IPO Horoscope Today | रखडलेली कामे पूर्ण होतील, आजचा दिवस 'या' राशींसाठी अत्यंत खास, आजचे राशीभविष्य काय सांगते पहा
x

ना पॅकेज, ना धोरण; लॉकडाउनच्या पद्धतीवर सोनिया गांधीची मोदी सरकारवर टीका

Sonia Gandhi, Lockdown

नवी दिल्ली, ६ मे: लॉकडाउनचा कालावाधी १७ मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. त्यानंतर पुढे मोदी सरकार काय करणार? कसं करणार? असे प्रश्न काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी उपस्थित केले आहेत. काँग्रेस शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत सोनिया गांधी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी कोरोना आणि लॉकडाऊनचा आढावा घेण्यासाठी आज काँग्रेसशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. या बैठकीमध्ये माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.

या बैठकीत राजस्थान, पंजाब, छत्तीसगड आणि पुद्दुचेरीच्या मुख्यमंत्री उपस्थित होते. त्यांनी या बैठकीत केंद्र सरकारकडे आर्थिक मदतीची मागणी केल्याची माहिती दिली. जो पर्यंत व्यापक असे प्रोत्साहन पॅकेज मिळत नाही, तोपर्यंत राज्य आणि देश कसा चालणार, असा प्रश्न राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी उपस्थित केला. आम्ही १० हजार कोटी रुपयांचा महसून गमावल्याचेही ते म्हणाले. राज्यांनी अनेकदा पंतप्रधानांकडे आर्थिक मदतीची मागणी केली आहे, मात्र पंतप्रधानांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचे ते म्हणाले.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनीही केंद्र सरकारवर टीका केली आहे. ‘सोनियाजी म्हणतात त्याप्रमाणे लॉकडाऊन ३.० नंतर काय? सरकारकडे पुढच्या परिस्थितीबाबत काय योजना आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यानंतरच्या धोरणाबाबत माहिती असले पाहिजे.’

 

News English Summary: The lockdown has been extended to May 17. What will the Modi government do after that? How to do Such questions have been raised by Congress President Sonia Gandhi. Sonia Gandhi interacted with the Chief Ministers of the Congress-ruled states through video conferencing. At the time, he posed the question.

News English Title: Story After May 17th What And After May 17th How What Criteria Is Government Of India Using To Judge How Long The Lockdown Is To Continue Asks congress president Sonia Gandhi.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x