23 January 2025 3:48 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
New Income Tax Regime | खुशखबर, 10 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना गिफ्ट, 1 रुपयाचाही टॅक्स भरावा लागणार नाही EPF Pension Money | खाजगी नोकरदारांना EPFO कडून इतकी महिना पेन्शन मिळणार, रक्कम फॉर्म्युला जाणून घ्या Rattanindia Power Share Price | 12 रुपयांचा पॉवर कंपनीचा शेअर तेजीत, कंपनीने महत्वाची अपडेट दिली - NSE: RTNPOWER Penny Stocks | 1 रुपयाचा शेअर खरेदी गर्दी, 1 दिवसात 9 टक्क्यांनी वाढला, मालामाल करतोय शेअर - Penny Stocks 2025 IRFC Share Price | आयआरएफसी शेअरबाबत महत्वाचे संकेत, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 34 टक्क्यांनी घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: RVNL Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनी शेअरमध्ये तेजीचे संकेत, रेटिंग अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL
x

ट्रम्प यांचा गुजरात दौरा; भिंतीने झाकल्यानंतर त्या कुटूंबांना आता घरं खाली करण्याची नोटीस

US President Donald Trump, Gujarat Ahemadabad slums, PM Narendra Modi

गांधीनगर: राष्ट्रपती झाल्यानंतर पहिल्या भारत दौऱ्यासाठी आपण अत्यंत उत्साही असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. अहमदाबादमध्ये विमानतळापासून ते मोटेरा स्टेडिअमपर्यंत ५ ते ७ लाख लोक माझं स्वागत करतील, असंही डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या भारत दौऱ्यात मोटेरा स्टेडिअमच्या नूतनीकरणानंतर निर्माण झालेल्या सरदार वल्लभभाई पटेल स्टेडिअमचं लोकार्पण करणार आहेत. हे जगातलं सर्वात मोठं स्टेडिअम असेल.

जगातील सर्वात शक्तीशाली नेत्याच्या स्वगातासाठी गुजरातमध्ये स्वागताची जोरदार तयारी सुरू आहे. गुजरात सरकारकडून अहमदाबादमध्ये ठिकठिकाणी तयारी सुरू केली जात आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, ट्रम्प यांच्या तीन तासांच्या गुजरात दौऱ्यासाठी तब्बल १०० कोटींचा खर्च करण्यात येत आहे. इतकंच नव्हे तर विमानतळ ते कार्यक्रम स्थळापर्यंतच्या प्रवासात ट्रम्प यांना झोपड्यांचं दर्शन होऊ नये यासाठी एक मोठी भिंतही उभारण्यात येते आहे.

दरम्यान, मोटेरा स्टेडियमजवळ असलेल्या ४५ झोपड्यांमध्ये जवळपास २०० जण वास्तव्यास आहेत. हे सर्व जण नोंदणीकृत बांधकाम मजूर आहेत. पुढील आठवड्यात होऊ घातलेल्या नमस्ते ट्रम्प कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर आपल्याला घरं रिकामी करण्यासाठी नोटीस बजावण्यात आल्याचा दावा रहिवाशांनी केला. गेल्या २० वर्षांपासून आपण याच भागात राहत असल्याचंदेखील त्यांनी सांगितलं. अहमदाबाद महापालिकेतल्या अधिकाऱ्यांनी मात्र रहिवाशांचा हा दावा फेटाळून लावला. रहिवाशांना पाठवण्यात आलेल्या नोटिशींचा ट्रम्प यांच्या कार्यक्रमाशी कोणताही संबंध नसल्याचं अधिकाऱ्यांना सांगितलं.

रहिवाशींनी घरं उभारलेली जमीन महापालिकेच्या मालकीची असल्याचं नोटिशीत नमूद करण्यात आलं आहे. ‘तुम्ही ज्या भागावर अतिक्रमण केलं आहे, ती जमीन महापालिकेची असून शहर रचना योजनेच्या अंतर्गत येते,’ असं पालिकेनं नोटिशीत म्हटलं आहे. रहिवाशांना घरं रिकामी करण्यासाठी सात दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. विशेष म्हणजे ही मुदत २४ फेब्रुवारीला संपते. याच दिवशी ट्रम्प अहमदाबादमध्ये येणार आहेत. झोपडपट्टीवासीयांना नोटिशीविरोधात अपील करायचं असल्यास त्यांना उद्यापर्यंतची मुदत देण्यात आलेली आहे.

दरम्यान, विकसित भारताचं स्वप्नं दाखवणाऱ्या गुजरातमध्ये भाजपाची मागील २५ वर्षांपासून सत्ता आहे आणि त्यात मोदींचा मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ सर्वाधिक आहे. आज मोदी देशाच्या पंतप्रधानपदी असून ही त्यांची दुसरी टर्म आहे. मात्र गुजरातमधील मुख्य शहरांमधील विदारक वास्तव समोर आलं आहे. ‘हम तो फकीर आदमी है, झोला लेके आये थे झोला लंके जायेंगे’ असं म्हणत मला गरिबीचं काहीच वाटत नसल्याचं सांगणाऱ्या मोदींच्या गुजरातमध्ये सध्या गरिबांच्या झोपड्या झाकण्यासाठी भिंती टाकण्याचे प्रताप सुरु आहेत.

मात्र त्याहून गंभीर बाब म्हणजे याची दखल आता आंतरराष्ट्रीय आणि प्रगत राष्ट्रांमधील प्रसार माध्यमांनी घेतल्याने मोदींचा खरा चेहरा जगासमोर उघडा पडल्याची चर्चा रंगली असून, मात्र त्याहून खेदाची गोष्ट म्हणजे यामुळे भारताचीच अवहेलना होताना दिसत आहे. इंग्लंड’मधील “इंडिपेन्डन्ट” या प्रसिद्ध माध्यमाने गुजरातमधील या भिंतीची दखल घेतली असून त्यात कठोर विचार देखील मांडले आहेत.

“इंडिपेन्डन्ट” यामध्ये संपूर्ण विषय मांडताना असं देखील म्हटलं आहे की, ‘गुजरातमधील मोदींचे सर्वात मोठे शहर अहमदाबादमध्ये गरिब झोपडपट्टीवासीयांची घरं भिंतीने झाकली जातं आहेत आणि मोदी सरकार गरिबांना लपविण्यासाठी करदात्यांचे पैसे वाया घालवित आहे असे देखील नमूद केलं आहे.

पुढे “इंडिपेन्डन्ट”ने याच झोपडीतील एका गरिबांचे विचार देखील मांडले आहेत आणि त्यांनी म्हटलं आहे की “गरीबी आणि झोपडपट्टी हे आपल्या जीवनाचे वास्तव आहे, परंतु मोदी सरकारला गोरगरीबांना लपवायचे आहे,” असे तीन दिवसांपेक्षा जास्त काळ कुटुंबासमवेत वास्तव्य करणारे एक कामगार भाऊभाई मफाभाई म्हणाले.

 

Web Title: Story Ahead US President Donald Trump visit 45 families Gujarat Ahemadabad slums gets eviction notices.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x