15 January 2025 12:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरबाबत मोठे संकेत, तज्ज्ञांकडून SELL रेटिंग, नेमकं कारण काय - NSE: NTPCGREEN HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना
x

कोरोना रॅपीड टेस्ट थांबवा, ICMR'चे सर्व राज्यांना आदेश

Covid 19, Corona crisis, ICMR

नवी दिल्ली, २१ एप्रिल: कोरोना विषाणूची लागण झाली आहे किंवा नाही यासाठी प्राथमिक स्वरुपात घेण्यात येत असलेल्या रॅपीड टेस्टमध्ये काही त्रूटी असल्याची तक्रार आयसीएमआरकडे आली आहे. या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही राज्यांनी पुढील दोन दिवस रॅपीड टेस्ट करु नये, असे आयसीएमआरने म्हटले आहे. दोन दिवसात आयसीएमआरचे पथक यासंदर्भात तपासणी करेल, त्यानंतर नवी अधिसूचना काढली जाईल, अशी माहिती आयसीएमआरचे प्रमुख डॉ. रमण गंगाखेडकर यांनी दिली.

चीनमधून मागवण्यात आलेले काही रॅपिड टेस्टिंग किटस सदोष निघाले आहेत. चीननं पाठवलेल्या रॅपिड टेस्टिंग किट्स चुकीच्या आहेत, असा खळबळजनक दावा राजस्थानचे आरोग्यमंत्री रघू शर्मा यांनी केला आहे. त्यामुळे राजस्थान सरकारनं चीनमधून आलेल्या या किट्सचा वापर करणं थांबवल आहे. राजस्थान सरकारनं मंगळवारी चीनमधून आलेल्या रॅपिड टेस्टिंग किट्स न वापरण्याचा निर्णय घेतला. यामुळे चीनमधून आयात करण्यात आलेल्या टेस्टिंग किट्सच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

आयसीएमआरकडून आठ पथके फिल्डवर पाठवण्यात येणार आहेत. यासाठी रक्त घेतल्यानंतर या रक्ताची टेस्ट केली जाते. अवघ्या पाच मिनिटात आपल्या शरीरात अँटीबॉडीज तयार झाल्या आहेत का याच्या माध्यमातून कोरोनासंदर्भातील प्राथमिक अंदाज बांधणे शक्य आहे. पण या टेस्टमध्ये योग्य निष्कर्ष समोर येत नसल्याची तक्रार एका राजस्थान सरकारकडून करण्यात आली आहे.

 

News English Summary: The ICMR has received a complaint that there are some errors in the rapid test, which is being carried out preliminaryly to find out if the corona virus has been infected. In the wake of this complaint, no state should conduct rapid tests for the next two days, the ICMR said. ICMR team will investigate in two days, after which a new notification will be removed, said ICMR chief Dr. Presented by Raman Gangakhedkar.

News English Title: Story all states stopped using the Covid 19 rapid testing kits for Corona Virus says ICMR News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x