22 February 2025 5:32 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या Railway Confirm Ticket | रेल्वेची तिकिट कन्फर्म आणि ट्रेन सुटली, तुम्ही दुसऱ्या ट्रेनने प्रवास करू शकता का? नियम लक्षात ठेवा Credit Card EMI | क्रेडिट कार्डच्या मोठ्या बिलाचे EMI मध्ये रूपांतर कसे करावे? थकीत रक्कम भरणे सोपे होईल Numerology Horoscope | नशीब आणि आकड्यांचा खेळ, अंकज्योतिषशास्त्रानुसार 16 फेब्रुवारी तुमचा रविवारचा दिवस कसा असेल IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी होईल मोठी कमाई, अशी संधी सोडू नका - IPO Watch SBI Home Loan | SBI बँकेतून 25 लाखांचे होम लोन 15 वर्षांसाठी घेतले तर, किती रुपयांचा मासिक EMI भरावा लागेल, येथे पहा Smart Investment | पगारदारांनो, पैसे बँकेत ठेऊन वाढत नसतात, या योजनेत महीना 5000 रुपये बचत देईल 2.5 कोटी रुपये परतावा
x

अण्णांमुळे 'ब्रँड' केजरीवाल उदयास आला; त्यांनाच शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण नाही

Anna Hajare, CM Arvind Kejarival

नवी दिल्ली : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांचे एकेकाळचे सहकारी आणि आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल आता तिसऱ्यांदा दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी सज्ज आहेत. अरविंद केजरीवाल यांच्याकडून शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धाडण्यात आलंय. परंतु, उल्लेखनीय म्हणजे अद्याप या सोहळ्याचं निमंत्रण अण्णा हजारे यांना मिळालेलं नाही. त्यामुळे, या शपथविधीसाठी अण्णा हजारे यंदा तरी उपस्थित राहणार का? याची उत्सुकता कायम आहे.

आम आदमी पक्षाचे नेते आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा राजकीय प्रवास अण्णा हजारेंच्या लोकपाल आणि लोकायुक्ताच्या मागणीसाठी २०११ साली झालेल्या आंदोलनानंतर सुरु झाला होता. अण्णा हजारेंच्या भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनाच्या समाजिक क्षेत्रात काम करत असताना अरविंद केजरीवाल यांनी २ ऑक्टोबर २०१२ साली सामाजिक क्षेत्रातून राजकीय क्षेत्रात उडी घेत आम आदमी पक्षाची स्थापना केली होती. त्यावेळी त्यांनी स्वत:च्या डोक्यावर गांधी टोपी घालून सर्वाचे लक्ष वेधले होतं.

दरम्यान अरविंद केजरीवाल यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी दिल्लीतील रामलीला मैदानावर जोरदार तयारी सुरु आहे. तसेच पोलिसांचा बंदोबस्तही चोख ठेवण्यात आला आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी तीन हजार पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे असंही एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं.

अण्णांना शपथविधीसाठी आमंत्रण देण्यात आलेले नाही, या संदर्भात केजरीवाल यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या सचिवाने केजरीवाल सध्या माध्यमांशी बोलणार नसल्याचे म्हटले. तर अण्णा यांना देखील केजरीवाल यांच्या शपथग्रहण सोहळ्याविषयी विचारण्यात आले. त्यावर अण्णांनी काहीही उत्तर न देता स्मितहास्य केले. दुसरीकडे अण्णांचे सचिव संजय पठाडे यांनी म्हटले की, दिल्लीत केजरीवाल यांची पुन्हा सत्ता आली आहे. मात्र यावर अण्णा काहीही प्रतिक्रिया देणार नाही. गांधी विचारांच्या अण्णांनी २० डिसेंबरपासून मौन धारण केल्याचे त्यांनी सांगितले.

 

Web Title: Story Anna Hazare did not get invitation for Delhi State CM Arvind Kejriwal swearing in Ceremony yet.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Arvind Kejariwal(39)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x