28 December 2024 1:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअरवर ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: BEL Cochin Shipyard Share Price | PSU कोचीन शिपयार्ड शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट - NSE: COCHINSHIP Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 55 टक्केपर्यंत परतावा - NSE: ASHOKLEY IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर ब्रेकआऊट देणार. तज्ज्ञांनी दिले तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRFC Suzlon Share Price | सुझलॉन शेअर टॉप लेव्हलवरून 25% घसरला, आता 100 रुपयांच्या पार जाणार - NSE: SUZLON Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्स फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS NBCC Share Price | एनबीसीसी कंपनीबाबत फायद्याची अपडेट, मल्टिबॅगर शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार - NSE: NBCC
x

मी एकटी नाही, जे मी करतेय त्यामागे एक मोठी टीम काम करतेय: अमुल्या

Amulya Leona who given pro Pakistan Slogan, MIM Owaisi

बंगळुरू : सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात (सीएए) आयोजित करण्यात आलेल्या सभेत गुरुवारी पाकिस्तान समर्थनाच्या घोषणा देणाऱ्या एका तरुण महिलेविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा नोंदविण्यात आला असून तिची कोठडीत रवानगी करण्यात आल्याचे पोलिसांनी शुक्रवारी सांगितले. दरम्यान, या महिलेचे यापूर्वी नक्षलवाद्यांशी संबंध होते, असे कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी म्हटले आहे.

या महिलेचे नाव अमूल्या लिओना असे असून तिला ‘सेव्ह कॉन्स्टिटय़ूशन’ सभेच्या आयोजकांनी गुरुवारी एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्या उपस्थितीत भाषणासाठी निमंत्रित केले होते, तेव्हा तिने पाकिस्तान समर्थनाच्या तीनदा घोषणा दिल्या.

याच दरम्यान हिचे काही जुने व्हिडिओ सोशल मीडियावरून समोर येत आहेत. यापैंकी एका व्हिडिओत अमूल्या काही धक्कादायक खुलासे करताना दिसत आहे. असे कृत्य करणारी मी एकटी नाही असं म्हणतानाच, ती जे म्हणतेय किंवा करतेय त्यापाठी एक मोठी टीम काम करतेय, फक्त चेहरा आपला आहे, असं म्हणताना अमूल्या या व्हिडिओत दिसत आहे. उल्लेखनीय म्हणजे, ‘पाकिस्तान झिंदाबाद’ घोषणा देण्यापूर्वीचा अमूल्याचा हा व्हिडिओ आहे.

अमुल्याचे लोयोनाचे वडिल म्हणाले की, अमुल्याने सीएएच्या विरोधातील रॅलीमध्ये जाणं योग्य नव्हतं. मी तिला अनेकवेळा आंदोलनापासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता. मात्र अमुल्याने माझं काही ऐकलं नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच माझ्या मुलीला तुरुंगात पडून राहू द्या. पोलिसांना जर योग्य वाटत असेल तर अमुल्याचे पायही तोडून टाका असं म्हणत तिच्या वडिलांनी संताप व्यक्त केला आहे.

 

Web Title: Story Another Video of Amulya Leona who given pro Pakistan Slogan MIM Owaisi stage at Bengaluru.

हॅशटॅग्स

#MIM(30)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x