15 January 2025 11:44 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरबाबत मोठे संकेत, तज्ज्ञांकडून SELL रेटिंग, नेमकं कारण काय - NSE: NTPCGREEN HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना
x

कोरोना व्हायरस वटवाघुळांमधून माणसांमध्ये संक्रमित होत नाही: ICMR

Covid19, Corona Crisis, Bats

नवी दिल्ली, १५ एप्रिल: कोरोना विषाणूला थोपवण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकार संगनमताने योग्य ते निर्णय घेत आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दिली. सध्याच्या परिस्थितीत देशातील कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीवरुन जिल्हानिहाय तीन गटात वर्गवारी करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. देशातील १७० जिल्ह्यांचा हॉटस्पॉटमध्ये तर जवळपास २७० जिल्हे हे नॉन हॉटस्पॉट ठिकाणे म्हणून घोषित करण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे, अशी माहिती लव अग्रवाल यांनी दिली.

ICMR चे रामन गंगाखेडकर यांना वटवाघुळांमुळे करोना पसरतो का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना हा व्हायरस दोन प्रकारांच्या वटवाघुळांमध्ये आढळतो. मात्र तो वटवाघुळांमधून माणसांमध्ये संक्रमित होत नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. वटवाघुळातून माणसात कोरोना संक्रमित होण्याची शक्यता १ हजार वर्षात एखादी घडते असंही त्यांनी म्हटलं आहे.

तत्पूर्वी चीनच्या वुहान शहरातील वन्यजीव मांसाची बाजारपेठे हीच कोरोनाचं उगम स्थान असल्याचे समोर आल्याने संयुक्त राष्ट्राचे कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटीचे कार्यकारी सचिव एलिझाबेथ मारुमा क्रेमा यांनी बंदीची मागणी केली होती. अशा वन्यजीव बाजारपेठेंवर जागतिक बंदी घालून भविष्यातील साथीच्या आजारापासून बचाव केला जाऊ शकतो असं त्यांचं म्हणणं आहे.

तसेच चीन जैवविविधता संवर्धन आणि ग्रीन डेव्हलपमेंट फाउंडेशनचे सरचिटणीस, जिनफेंग झोऊ यांनी देखील कम्युनिस्ट सरकारला देशातील वन्यजीव बाजारांवर कायमची बंदी घालण्याचे आवाहन केले आहे. झोऊ पत्रकारांशी बोलताना म्हणाले की वन्यजीव बाजारांवर बंदी घालण्यामुळे मनुष्यावर रोगाचा प्रादुर्भाव होण्यापासून वाचवता येईल आणि प्राण्यांचे ही संरक्षण होईल. कोरोना हा विषाणू चीनच्या वुहान शहरातील सीफूड मार्केटमधून आला आहे. तेच कोरोनाचं उगम स्थान असून येथूनच मोठ्या आणि अवैद्यप्रकारे जनावरांचा व्यापार केला जातो.

 

News English Summary: Does ICMR’s Ramon Gangakhedkar get coronary arthritis? Such a question was asked. In response to this, the virus is found in two types of pesticides. However, he also explained that he does not transmit infections in humans. He also said that the probability of a coronary infection being transmitted from a person to a person within a thousand years.

News English Title: Story bats carried Corona virus which do not capable of affecting humans says Raman Gangakhedkar ICMR News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x