16 April 2025 7:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 17 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA Suzlon Share Price | 54 रुपयांचा शेअर पुढे किती फायद्याचा? गुंतवणूकदारांसाठी अपडेट, फायदा की नुकसान? - NSE: SUZLON Tata Steel Share Price | 180 रुपये टार्गेट प्राईस, बिनधास्त खरेदी करा, ब्रोकरेजकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL NTPC Green Energy Share Price | खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, कंपनीला मोठा भविष्यकाळ, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN
x

CAA: जाफराबादमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, गोळी लागून कॉन्स्टेबलचा मृत्यू

Delhi Maujpur Area, CAA, NRC

नवी दिल्ली: दिल्लीतील जाफराबादमध्ये सीएएविरोधात आंदोलन सुरु आहे. सोमवारी या आंदोलनाने हिंसक वळण घेतले. आंदोलकांनी अनेक गाड्यांना आग लावली. यादरम्यान गोळी लागल्याने एका पोलिस कॉन्स्टेबलचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. रतनलाल असे मृत्यू झालेल्या कॉन्स्टेबलचे नाव आहे. ते गोकूळपूर एसीपी कार्यालयात तैनात होते. कोणाच्या गोळीमुळे रतनलाल यांचा मृत्यू झाला हे अद्याप समजू शकलेले नाही.

घटनास्थळीची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी सुरूवातीस अश्रुधाराचा नळकांड्या देखील फोडल्या. यावेळी आंदोलकांकडून गोळीबार देखील करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, परिसरातील तीन वाहनं देखील पेटवून देण्यात आली आहेत. शिवाय, समाजकंटकांडून काही दुकानं जाळण्याचा देखील प्रयत्न करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.

सीएएचे समर्थक आणि विरोधक यांच्यात सुरू असलेल्या संघर्षामुळे दिल्ली मेट्रोने (डीएमआरसी) मौजपूर आणि बाबरपूर मेट्रो स्थानके बंद केली आहेत. जाफराबाद आंदोलनाच्या निषेधार्थ आणि सीएएच्या समर्थनार्थ ते रस्त्यावर उतरलेत. आम्ही दिल्लीत आणखी एक शाहीन बाग उभारू देणार नाही असं भाजपा नेते कपिल मिश्रा यांनी म्हटलं होतं. तसेच कपिल मिश्रा यांनी व्हिडिओ ट्विट करुन म्हटलंय की,”दुसरी शाहिन बाग दिल्लीत होऊ देणार नाही. तसेच लोकांना सीएएच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरण्याचे आवाहन केले आहे. मौजपूर चौकात दोन्ही बाजूची वाहतूक थांबवण्यात आली आहे. लोकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.

 

 

News English Summery: Due to the ongoing conflict between CAA supporters and opponents, Delhi Metro (DMRC) has closed the Mojpur and Babarpur metro stations. He took to the streets to protest the Jafarabad movement and in support of the CAA. BJP leader Kapil Mishra had said that we will not allow another tropical garden in Delhi. Also, Kapil Mishra tweeted the video saying, “Another Shaheen Bagh will not be allowed in Delhi.”

 

Web Title: Story caa NRC clash broke out between two groups in Delhi Maujpur Area.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#india(222)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या