22 January 2025 4:36 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Rama Steel Share Price | 65 पैशाचा शेअर श्रीमंत करतोय, डिफेन्स क्षेत्रातही प्रवेश, यापूर्वी 1748% परतावा दिला - NSE: RAMASTEEL Bonus Share News | फ्री बोनस शेअर्स देतेय ही कंपनी, संधी सोडू नका, 4085 टक्के परतावा दिला शेअरने - BOM: 531771 NTPC Share Price | एनटीपीसी शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, मजबूत परतावा मिळेल - NSE: NTPC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Top Up SIP | पगारदारांनो SIP गुंतवणूक नाही तर Top Up SIP करून बंपर परतावा मिळवा, पैशांचा पाऊस पडेल Jio Finance Share Price | नव्या व्यवसायात जिओ फायनान्शियल कंपनीचा प्रवेश, तज्ज्ञांचा शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH
x

CAA समर्थक आणि CAA विरोधक एकमेकांना भिडले

CAA, NRC

नवी दिल्ली : दिल्लीतल्या झाफराबाद परिसरात सुरू असलेल्या सीएए आणि एनआरसी विरोधातील आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. सीएए समर्थक आणि सीएए विरोधक एकमेकांना भिडलेत. मोठ्या प्रमाणात दगडफेकही झाली आहे. दुर्गापूरी आणि मौजपूर परिसरात दगडफेक झाली आहे. या ठिकाणी निमलष्करी दलालाही पाचारण करण्यात आलं आहे.

सीएएच्या समर्थकांनी आणि विरोधकांनी कबीरनगर मेट्रो स्थानकाजवळ एकमेकांवर दगडफेक सुरू केली, त्यामुळे येथील रस्त्यावर लोकांमध्ये धावपळ झाली. या दगडफेकीत एक जण जखमी झाला असून पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केले आहे. दोन्ही बाजूंनी होणारी दगडफेक रोखण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले. लोकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचे गोळे हवेत उडवले. मौजपूरमध्ये भाजप नेते कपिल मिश्रा यांचे समर्थक आहेत, तेथून अवघ्या अर्धा किलोमीटर अंतरावर जाफराबादमध्ये सीएए विरोधी आंदोलन सुरु आहे.

दरम्यान, शनिवारी रात्रीच आंदोलनासाठी मेट्रो स्थानक परिसरात महिला मोठ्या प्रमाणात दाखल झाल्या. त्यांनी मेट्रो स्टेशन परिसराचा ताबादेखील घेतला होता. यावेळी त्यांनी जाफराबादकडे जाणारा संपूर्ण रस्ता अडवून धरला होता.

जाफराबादमधील आंदोलनावर भाजप नेते विजय गोयल म्हणाले की, “हे नियोजित पद्धतीने घडत आहे, मोदींना पराभूत करू न शकलेले यामागे आहेत.” संसदेत कायदा मंजूर झाल्यानंतर अशाप्रकारे आंदोलन करणे चुकीचे आहे ‘पोलिसांना हवे असल्यास त्यांनी कोणतीही कारवाई केली असती, परंतु मुले व स्त्रिया आहेत, यामुळे कारवाई करता येत नाही.

 

 

 

News English Summery: CAA supporters and protesters started stabbing each other near the Kabirnagar metro station, causing a rush of people on the streets here. One person was injured in the stabbing and police have rushed him to the hospital. Police tried to stop the stone pelting on both sides. Police fired tear gas shells to disperse people. There is a supporter of BJP leader Kapil Mishra in Maujpur, from which a half-kilometer distance, an anti-CAA movement is underway in Jaffarabad.

Web Title: Story CAA Supporters and opponents stone pelting over each other Maujpur area tear gas shells fired.

हॅशटॅग्स

#india(222)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x