22 November 2024 5:38 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

छत्तीसगड: नक्षलवाद्यांंशी चकमक; १७ जवान शहीद

Chhattisgarh 17 Soldiers Martyr, Sukma Encounter with Naxals

सुकमा, २२ मार्च:  छत्तीसगडच्या सुकमामध्ये पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत १७ जवान शहीद झाले. शुक्रवारी रात्री एलमागुंडा जिल्ह्यात चिंतागुफामध्ये DRG, STF बुर्कापाल आणि कोबरा बटालियनची टीम रात्री दीड वाजता ऑपरेशनवर निघाली होती. ऑपरेशनवरून परतताना दुपारी दीड वाजता नक्षलवाद्यांची चकमक झाली. ही चकमक ३ तास चालली. या हल्लात काही बडे नक्षली म्होरके मारले गेल्याचीही माहिती मिळाली आहे.

हे जवान STF, DRG आणि कोबरा बटालियनचे होते. तसेच ३ डीआरजी चिंतागुफा आणि आर्मीची जवान यात सामील होते. नक्षलवाद्यांना या चकमकीनंतर १२ एके ४७ सह १५ हत्यारांची लूट केली आहे. या बाबत मिळालेल्या माहितीनुसार, कोजारगुडाच्या डोंगरभागात झालेल्या या चकमकीदरम्यान सुरक्षा दलाचे १४ जवान जखमी झाले होते. तर, या दरम्यान अनेक नक्षलवादी ठार झाल्याचा दावा पोलिसांनी केला.

पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या चकमकीनंतर सुरक्षा दलाचे १७ जवान बेपत्ता होते. या बेपत्ता झालेल्या जवानांच्या शोधासाठी मोठ्या संख्यने पथके जंगलांमध्ये रवाना झाली. संयुक्त टीम एल्मागुंडाजवळ पोहोचताच नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. या हल्ल्याला संयुक्त टीमनंदेखील चोख प्रत्युत्तर दिलं. यामध्ये पाच नक्षलवादी मारले गेले. तर तितकेच जखमीदेखील झाले. या कारवाईदरम्यान नक्षलवाद्यांनी जवानांकडील शस्त्रसाठा पळवला. यामध्ये एके-४७, इंसास, एलएमजीचा समावेश आहे. कालपासून काही जवान बेपत्ता झाले. त्यांच्या शोधासाठी १५० सुरक्षा अधिकारी रवाना झाले होते. अखेर आज १७ जवानांचे मृतदेह हाती लागले.

 

News English Summery:  In a clash between police and Naxals in Chhattisgarh’s Sukma, 17 soldiers were martyred. On Friday night, teams of DRG, STF Burkapal and Cobra Battalion were on their way to the operation at around 1:30 pm in Chintagupha in Almagunda district. On the way back from the operation, the Maoists clashed at around 1:30 pm. This encounter lasted 3 hours. It has also been reported that some large Naxalites were killed in the attack. These jawans belonged to the STF, DRG and the Cobra Battalion. Also involved in the 3 DRG concern cave and Army jawans. The Naxals have been robbed of 15 killers, including 12 AK47s, after the encounter. According to information received, 14 security personnel were injured during the clash in Kojarguda hills. Meanwhile, police claimed that many Naxals were killed in the meantime.

 

News English Title:  Story Chhattisgarh 17 Soldiers Martyr in Sukma encounter with Naxals dead bodies of 13 soldiers found News Latest Updates.

हॅशटॅग्स

#india(222)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x