17 April 2025 1:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा शेअर्समध्ये हलकी तेजी, लॉन्ग टर्ममध्ये 400% रिटर्न दिला, अपडेट जाणून घ्या - NSE: GTLINFRA Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: ASHOKLEY Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्सबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, BUY, SELL की Hold करावा? - NSE: SUZLON Tata Power Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा पॉवर शेअर मालामाल करणार, कमाईची संधी सोडू नका - NSE: TATAPOWER NTPC Green Energy Share Price | खरेदीनंतर संयम ठेवा, श्रीमंत करू शकतो हा शेअर, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN Vodafone Idea Share Price | तब्बल 66 टक्के परतावा मिळेल, पेनी स्टॉक फोकसमध्ये, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा
x

भाजपसोबत पक्ष संपवण्यापेक्षा युपीए'सोबत पक्ष वाढविण्यासाठी सोनिया-उद्धव यांची भेट? - सविस्तर वृत्त

10 Janpath, Sonia Gandhi, CM Uddhav Thackeray

नवी दिल्ली : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. सोनिया गांधी यांच्या 10 जनपथ या निवासस्थानी उद्धव ठाकरे त्यांची भेट घेतील.आज दुपारी दीड ते दोनच्या सुमारास ही भेट होण्याची शक्यता आहे. भाजपशी फारकत घेऊन राज्यात महाविकासआघाडीचं सरकार स्थापन करणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत. याबाबत स्वतः शिवसेनेचे संसदीय नेते आणि खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. तसेच ही सदिच्छा भेट असल्याचं म्हणत या भेटीच्या तपशिलात खोल शिरण्याची गरज नसल्याचंही राऊत म्हणाले.

या पार्श्वभूमीवर राज्यात एनपीआर लागू करण्याचा निर्णयाचा फेरविचार करण्याचं आवाहन, या भेटीत सोनिया गांधींकडून उद्धव ठाकरेंना केलं जाण्याची शक्यता आहे. विविध राज्यांतल्या भाजपेतर सरकारांनी एनपीआर बाबत घेतलेली विरोधाची भूमिका, महाराष्ट्रातही महाविकास आघाडीनंही घ्यावी अशी काँग्रेस तसंच राष्ट्रवादीचीही उद्धव ठाकरेंकडून अपेक्षा आहे.

दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज भेट होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्लीला जाऊन पंतप्रधानांची भेट घेणार आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांची मोदींशी ही दुसरी भेट आहे. याआधी पुण्यात पंतप्रधान आले असताना दोघांची विमानतळावर भेट झाली होती. पण ती फक्त काही मिनिटांपुरतीच होती. आता दोघांची सविस्तर भेट होणार आहे. यावेळी राज्याला मिळणाऱा निधी आणि महापूरात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठीच्या मदतीबद्दल चर्चा होण्याची शक्यता आहे.

मात्र, उद्धव ठाकरे यांची दिल्ली वारी केवळ मोदीभेटीसाठीच चर्चेत नसून उद्धव ठाकरे पहिल्यांदाच काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. याआधी त्यांच्या कार्यक्रमांदरम्यान औपचारिक भेटी झाल्या होत्या. मात्र, आता काँग्रेसच्या पाठिंब्यावर शिवसेनेचे सरकार बनल्याने ही भेट महत्वाची असणार आहे. सोनिया गांधींची भेट घेणारे ते ठाकरे घराण्यातील तिसरे असणार आहेत. याआधी गेल्या वर्षी राज ठाकरेंनी ईव्हीएम’च्या मुद्यावरून सोनिया गांधींची भेट घेतली होती. त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर आदित्य ठाकरे दिल्लीत जाऊन सोनिया गांधी यांना शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण दिले होते. उद्धव ठाकरे यांच्या भेटीगाठी औपचारिक असल्याचे सांगण्यात येत असले तरी सोनिया गांधी यांच्या भेटीत शिवसेनेला संपुआत घेण्यावर चर्चा होऊ शकते असं राजकीय विश्लेषकांना वाटतं.

 

Web Title: Story Chief Minister Uddhav Thackeray to meet congress president Sonia Gandhi today at 10 Janpath.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Soniya Gandhi(8)#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या