23 February 2025 8:57 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

कर्मचारी व जवानांच्या महागाई भत्त्यात कपात, पण बुलेट ट्रेनला स्थगिती नाही? - राहुल गांधी

PM Narendra Modi, Bullet Train, Rahul Gandhi

नवी दिल्ली, २४ एप्रिल: केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना आणि निवृत्तीवेतनधारकांना एक जानेवारी २०२० पासून देय असलेला महागाई भत्ता सध्या देण्यात येणार नसल्याचे केंद्रीय अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे. देशातील कोरोना विषाणू संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला.

केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना महागाई भत्त्याचे तीन टप्पे मिळणार होते, ते जवळपास दीड वर्षासाठी आता मिळणार नाहीत. महागाई भत्त्याचा पुढील टप्पा आता थेट जुलै २०२१ नंतरच मिळेल. सरकारच्या या निर्णयाचा परिणाम १.१३ कोटी कुटुंबावर होणार आहे. शिवाय केंद्र सरकारच्या ४८ लाख कर्मचारी आणि ६५ लाख पेन्शनधारकांना हा भत्ता मिळणार नाही.

केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे की, केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्याची अतिरिक्त देय रक्कम आणि केंद्र सरकारच्या निवृत्तीवेतनधारकांना महागाई मदत सध्या मिळणार नाही. एक जानेवारी २०२० पासून देय असलेली ही रक्कम सध्या कर्मचाऱ्यांना देण्यात येणार नाही.

या प्रकरणावरुन काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी ट्विट करुन मोदी सरकारवर टीका केली आहे. केंद्रीय कर्मचारी, पेन्शन धारक आणि देशातल्या जवानांच्या महागाई भत्त्यात कपात करण्याऐवजी मोदी सरकारने बुलेट ट्रेनचा लाखो-कोट्यवधी रुपयांचा प्रकल्प स्थगित का केला नाही? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.

काय म्हटलं आहे नेमकं ट्विट मध्ये;
“कोट्यवधी रुपयांच्या बुलेट ट्रेन प्रकल्पाला आणि केंद्रीय व्हिस्टा सौंदर्यकरण परियोजना यांसारख्या योजनांना स्थगिती देण्याऐवजी करोनाशी सातत्याने लढणाऱ्या केंद्रीय कर्मचारी, पेन्शन धारक आणि देशाच्या जवानांच्या महागाई भत्त्यात (DA) कपात करणं हा सरकारचा असंवेदनशील आणि अमानवीय निर्णय आहे”

 

News English Summary: Instead of postponing the multi-billion rupee bullet train project and schemes like the Central Vista beautification project, it is an insensitive and inhumane decision of the government to reduce the dearness allowance (DA) of central employees, pensioners and the country’s soldiers who are constantly fighting the Corona.

News English Title: Story Congress Mp Rahul Gandhi Attacks On PN Narendra Modi Government About Central Employee Da Cut News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x