17 April 2025 1:12 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 17 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA
x

आपत्तीकाळात देशभक्त सर्जन डॉक्टर संबित पात्रा टेलरच्या भूमिकेत...नेटकरी संतापले

Corona Crisis. Covid19, Sambit Patra

नवी दिल्ली, ११ एप्रिल: लॉकडाऊनच्या १८ व्या दिवशी अर्थात शनिवारी सकाळपर्यंत देशातील करोनाबाधितांची संख्या ७४४७ वर पोहचली आहे. यामध्ये ७१ परदेशी नागरिकांचा समावेश आहे. देशातील २३९ जणांना करोनामुळे प्राण गमवावे लागले आहेत. तर दुसरीकडे ६४३ जणांनी करोनावर यशस्वीरित्या मात केलीय. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलाय.

सध्या देशातील ६१ टक्के कोरोनाबाधित रुग्ण ६ राज्यात आढळले असल्याची माहिती पुढे आली आहे. यामध्ये महाराष्ट्र, दिल्ली, तामिळनाडू, तेलंगाना, कर्नाटक, केरळ राज्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे याच ६ राज्यांत सर्वाधिक ५२ लॅब आहेत. त्यामुळेच रुग्णांचे प्रमाण सर्वाधिक आहेत. आता नवीन २१ लॅब स्थापन करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यापैकी ५ लॅब याच ६ राज्यात स्थापन होणार आहेत.

देशातील परिस्थिती चिंताजनक होतं असल्याने मोदींनी देखील वैद्यकीय सेवेतील आजी-माजी डॉक्टरांना सुद्धा आवाहन करत संकट काळात देशसेव करावी असं म्हटलं आहे. मात्र व्यवसायाने सर्जन डॉक्टर असणारे संबित पात्रा देशावर संकट येताच टेलरच्या भूमिकेत गेल्याची चर्चा समाज माध्यमांवर रंगली आहे. विशेष मध्ये भाजप नेते डॉक्टर संबित पात्रा अनेक टीव्ही वृत्तवाहिन्यांवर विखारी भाषा वापरून भूमिका मांडण्यात चपळ आहेत. त्यात कोणत्याही चर्चेत ते कोणत्याही मुद्यावरून एखाद्याला सहज राष्ट्रदोही शिक्के मारत स्वतःची देशभक्ती किती महान आहे ते किंचाळत सांगत असतात. मात्र सध्या आपत्ती काळात मोदींच्या आवाहनाकडे दुर्लक्ष करून स्वतःला सुरक्षित ठेवणं उचित समजत आहेत.

 

News English Summary: Since the situation in the country is worrisome, Modi has also appealed to the ex-doctors of medical care and asked them to serve the country in times of crisis. However, on the social media, there is talk of Taylor being a surgeon by profession when he is in crisis. In particular, BJP-led doctor-related characters are clever in portraying the role of villain on many TV news outlets. In any discussion, at any given point, they simply shout at one of them, shouting how great their patriotism is. However, in the current time of disaster, it seems reasonable to ignore Modi’s call to protect himself.

News English Title: Story Corona crisis Doctor Sambit Patra doing Tailoring Netizens fire on BJP Leader Covid19 News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या