12 January 2025 3:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, पेनी स्टॉकवर होणार परिणाम - NSE: IDEA SIP Mutual Fund | 4000 गुंतवणुकीतून 20 लाखांचा फंड तयार होण्यासाठी किती वर्षांचा काळ लागेल, पैशाने पैसा वाढवा Post Office Scheme | दुप्पटीने पैसे वाढवणारी पोस्टाची सुपरहिट योजना; पडेल पैशांचा पाऊस, सविस्तर कॅल्क्युलेशन पहा Credit Card Alert | 'या' व्यक्तींनी चुकूनही क्रेडिट कार्डचा वापर करू नये; कर्ज तर वाढेलच आणि सिबिल स्कोर देखील खराब होईल Home Loan Prepayment | गृहकर्ज मुदतीपूर्वी फेडताय, प्री-पेमेंट करण्यापूर्वी जाणून घ्या पेनल्टी चार्जेस किती भरावे लागतील SBI Bank Scheme | SBI बँकेच्या नव्या योजनेचा फायदा घ्या; केवळ 80 रुपयांच्या गुंतवणुकीतून बनाल लाखांचे मालक SIP Mutual Fund | 1000, 2000, 3000 आणि 5000 रुपयांची SIP किती कोटी रुपये परतावा मिळेल, जाणून घ्या रक्कम
x

५० कोटी भारतीयांना COVID 19 चाचणी उपचार मोफत

Covid 19, Corona Crisis, NHA, National Health Organisation

नवी दिल्ली, ४ एप्रिल: करोनाचं संकट गहिरं होत असताना एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. मोदी सरकारने करोनाची चाचणी आणि उपचार हे आयुष्मान भारत योजने अंतर्गत आणणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे देशभरातल्या ५० कोटी लोकांची चाचणी किंवा उपचार हे मोफत होऊ शकणार आहेत. नॅशनल हेल्थ अथॉरिटी अर्थात NHA ने यासंदर्भातली माहिती दिली आहे.

दुसरीकडे दिल्लीत केंद्रीय आरोग्य मंत्रालयातर्फे माहिती देताना लव आगरवाल म्हणाले, कालपासून आजपर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ६०१ ने वाढली आहे. देशात सध्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २९०२ इतकी झाली आहे. काल कोरोनामुळे देशात १२ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे या आजाराने मृत पावलेल्यांची संख्या ६८ इतकी झाली आहे. आतापर्यंत देशात १८३ जणांना आजारातून बरे झाल्यामुळे डिस्चार्ज देण्यात आला आहे, असेही त्यांनी सांगितले.

दिल्लीच्या निझामुद्दीनमधील तबलीघी जमात मकरझमधील कार्यकर्ते आणि त्यांच्याशी संबंधित तब्बल २२ हजार जणांना देशभरात क्वारंटाइन करण्यात आलं आहे, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाच्या संयुक्त सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव यांनी दिली. देशात तबलीघींसंबंधी १७ राज्यांमध्ये करोनाचे १०२३ रुग्ण आढळून आले आहेत. ही संख्या देशातील एकूण रुग्णांपैकी ३० टक्के आहे. यामुळे आरोग्य विभाग आणि प्रशासन अजूनही लक्ष ठेवून आहे आणि करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असं लव अग्रवाल यांनी स्पष्ट केलं.

 

News English Summary: The central government has taken a very important decision while the Karona crisis is deepening. Modi government has decided to bring the test and treatment of Corona under Ayushman Bharat Yojana. As a result, the treatment or treatment of more than 50 million people across the country will be free. The National Health Authority (NHA) has provided this information.

 

News English Title: Story Corona Crisis National Health organisation made Covid 19 test free News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x