कोरोनाचा फैलाव रोखण्यात मोदी सरकार अपयशी; राज्यांकडून आरोपांना सुरुवात
नवी दिल्ली, ०९ एप्रिल: बुधवारी ८ मार्च रोजी देशव्यापी लॉकडाऊनचा १६ वा दिवस… आज सायंकाळच्या सुमारास केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं एक पत्रकार परिषद घेऊन देशातील करोना फैलावाबद्दल माहिती दिली. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, आत्तापर्यंत जवळपास ४७३ रुग्णांवर उपचार यशस्वी ठरलेत. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलाय. तसंच आत्तापर्यंत देशात आढळलेल्या करोनाबाधित रुग्णांची संख्या आज ५७३४ वर पोहचलीय. उल्लेखनीय म्हणजे, यातले ५४९ रुग्ण गेल्या २४ तासांत सापडले आहेत.
देशभरात कोरोनाचा फैलाव होतं असताना आता केंद्रावर देखील आरोप होण्यास सुरुवात झाली आहे. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनी कोरोना विषाणूच्या होत असलेल्या फैलावावरून केंद्र सरकारवर गंभीर आरोप केला आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यात केंद्र सरकार अपयशी ठरले असल्याचा आरोप भुपेश बघेल यांनी केला आहे.
आम्ही राहुल गांधींच्या सल्ल्यानुसार निर्णय घेऊन काम केले त्यामुळे आमच्या राज्यात कोरोनाचा फैलाव रोखण्यात आम्ही यशस्वी ठरलो, असा दावाही बघेल यांनी यावेळी केला. भुपेश बघेल म्हणाले की, ‘कोरोनाचा भारतात घुसण्यापासून रोखण्याची जबाबदारी केंद्र सरकारची होती. जर आंतरराष्ट्रीय प्रवास करून आलेल्या सर्व प्रवाशांना कवारेन्टीन केले असते तर कोरोनाचा रोखता आले असते. दुसरीकडे मी राहुल गांधींच्या सल्ल्यानुसार काम केले. त्यामुळे कोरोनाचा फैलाव रोखण्यात आम्हाला यश आले.’
दुसरीकडे केंद्र सरकारने लॉकडाऊनची मुदत वाढवण्याबाबत निर्णय घेण्यापूर्वीच ओडिशा सरकारने लॉकडाऊन वाढवला आहे. लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेणारे ओडिशा देशातील पहिले राज्य आहे.
News English Summary: Corona spreading across the country, allegations are now being made at the Center. Chhattisgarh Chief Minister Bhupesh Baghel has blamed the central government for the outbreak of the Corona virus. Bhupesh Baghel has accused the central government of failing to curb the spread of corona.
News English Title: Story corona virus central government fails prevent spread corona serious allegations Chhattisgarh chief Minister Bhupesh Baghel Covid19 News Latest updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS