22 February 2025 9:29 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Home Loan Charges | 90 टक्के पगारदारांना माहित नाही, बँकेतून गृह कर्ज घेताना कोणकोणते चार्जेस वसूल केले जातात 5G Mobile Under 10000 | स्मार्टफोन सॅमसंग Galaxy F06 5G ची भारतात सेल सुरू, किंमत फक्त 10,000 रुपये, इथे पहा ऑफर्स VIDEO | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या त्या कृत्याने टाळ्यांचा कडकडाट, शरद पवारांसोबत कार्यक्रमात हजेरी Bonus Share News | 1 वर 1 फ्री बोनस शेअर देणार ही कंपनी, स्टॉक खरेदीला गर्दी, रेकॉर्ड डेट पूर्वी गुंतवणूकदारांची धावपळ UPI ID | आता UPI द्वारे पेमेंट करताना मोजावे लागतील एक्सट्रा चार्जेस, या गुगल-पे ने केली सुरुवात, अपडेट जाणून घ्या Railway Ticket Booking | ऑनलाइन की काऊंटर रेल्वे टिकीट, दोघांमधील स्वस्त तिकीट कोणते, हे माहित असु द्या Home Loan with SIP | पगारदारांनो, होम लोन EMI सह 15% एसआयपी करा, लोन फिटताच संपूर्ण व्याज वसूल होईल
x

२१ दिवस लॉकडाउन; काम नसल्याने उपाशी मरण्यापेक्षा मजूर गावाकडे पायी चालत

Corona Crisis, Corona Virus

नवी दिल्ली, २७ मार्च: मोदींनी २१ दिवसांचा लॉकडाउन केल्यानंतर इतके दिवस कुटुंबाने जगायचे कसे या प्रश्नाने रोजंदारीवर कामं करून पोट भरणाऱ्या लोकांचं आयुष्यच टांगणीला लागलं आहे. कामाच्या निमित्ताने जेथे हे मजूर कामगार वास्तव्यास होते तेथे कामच नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे आणि २१ दिवस असेच शांत बसून राहिलो तर कोरोना आधीच आयुष्य असंच संपणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे २१ दिवस न थांबता हे मजूर त्यांच्या गावी म्हणजे एका राज्यातून दुसऱ्या राज्यात थेट पायी चालत जाताना दिसत आहेत. संपूर्ण देशातील हायवेवर हेच चित्र पाहायला मिळत आहे.

दिल्लीच्या एनसीआरमधून अचानक निघालेल्या लोकांची ही गर्दी हायवेवर पाहायला मिळते. जे लोक गावाकडे जायला निघालेत. हे कारखान्यात काम करणारे मजूर आहेत. कंपन्या बंद पडल्याने एका क्षणात हे सगळे बेरोजगार झालेत. या लोकांचे गावाकडे पलायन करणं सरकारसाठीही चिंतेचा विषय बनलं आहे. लॉकडाऊनचा अर्थ लोकांना धोक्यात घालणं नसून लोकांची गर्दी रोखणं हे आहे.

गुरुवारी अशा लोकांची गर्दी दिल्ली-जयपूर महामार्गावरुन आपापल्या घराकडे जात होती. सर्वांकडे सामना, लहान मुलं आहेत. बर्‍याच जणांची एकच तक्रार आहे लॉकडाऊन जाहीर करण्यापूर्वी आधी सांगितलं का नाही? फरीदाबादपासून ५५० कि.मी. अमेठीला चालत निघालेले प्रताप गुप्ता म्हणाले,आम्हाला जर पूर्वी माहित असते तर आम्हाला चालत जाण्याची गरज पडली नसती.

करोना विषाणू फैलावण्याच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ मार्च रोजी मध्यरात्रीपासून संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषित केला. आज या लॉकडाऊनचा तिसरा दिवस… परंतु, तीन दिवसांतच हातावर पोट भरणाऱ्या गरिबांना मात्र आपलं आणि आपल्या कुटुंबाचं काय होणार? हा प्रश्न सतावतोय. देशातील हजारो संस्थांनी आपल्याकडे कामाला असणाऱ्या मजुरांना घरी जाण्याचे आदेश फर्मावलेत. देशात विविध ठिकाणांहून अशा कित्येक कहाण्या आता समोर येत आहेत.

करोनाच्या भीतीनं लॉकडाऊनमुळे सगळा व्यवसाय बंद झालं… रोजंदारीवर मिळणारे पैसे बंद झाले… राहायला हक्काचं घर नाही, पुढचा महिनाभरही पुरेल एवढं घरात धान्य नाही… अशात मुला-बाळांसहीत मोठ्या शहरांत राहणार कसं? हा प्रश्न यांच्यासमोर ‘आ’ वासून उभा आहे. आपल्या गावच्या घरी परतायचं तर जाणार तरी कसं कारण घरी परतण्याचे सगळे मार्ग बंद झालेत. वाहतुकीची साधनंच नसल्यानं शेवटी अनेकांनी पायीच घर गाठायचं धाडस करत भर उन्हातान्हात रस्ता धरलाय.

 

News English Summary: After Modi’s 21-day lock down, the question of how a family can live for so long has begun to fill the lives of those who work for their wages. They say there is no hunger strike due to lack of work where these laborers lived for work and if they stay quiet for 21 days, they say that Corona will end their life already. So, without having to wait 21 days, these laborers appear to be walking straight from one state to another. This is the picture seen on highways across the country. This crowd of people suddenly leaving from NCR in Delhi is seen on the highway. People who are going to the village. These are factory workers. All of them were unemployed in a moment as the companies closed down. It is also a matter of concern for the government to leave these people to their villages. Lockdown is not meant to endanger people but to stop the crowd.

 

News English Title: Story Corona virus in India lock down effect on migrant workers News latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x