भाजप आमदाराच्या मुलीच्या लग्नाला मुख्यमंत्री येडियुरप्पा व ३ हजार पाहुण्यांची उपस्थिती
नवी दिल्ली, ३१ मार्च : कोरोनाव्हायरसने साऱ्या जगात हाहाकार माजला आहे. मागील २४ तासात जगभरात ६१ हजारहून अधिक रुग्णांची नोंद झाली. यामुळे आता कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ७ लाख ८४ हजारावर पोहचली आहे. तर मृतांची संख्या ३७ हजार ६३९. मागील २४ तासात ३४१९ लोकांचा मृत्यू झाला. यातील अमेरिकेतच २० हजारहून अधिक नवीन रुग्ण समोर आले आहेत. तर स्पेनमध्ये ९१३ लोकांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, भारतात करोनाचा प्रादुर्भाव वाढतच असतानाच, ‘हा प्रादुर्भाव दुसऱ्याच टप्प्यात असून भयावह अशा सामुदायिक प्रसाराच्या टप्प्यात पोहोचलेला नाही’, असा थोडाफार दिलासा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशवासीयांना दिला आहे. ‘भारतात करोनाचा प्रादुर्भाव मर्यादित स्वरूपात आणि स्थानिक पातळीवरच आहे. करोनाचा फैलाव सामुदायिक पातळीवर होणार असेल तर जनतेला खूपच जास्त सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येईल, पण सध्या तरी ती वेळ आलेली नाही’, असे आरोग्य मंत्रालयाने सोमवारी स्पष्ट केले.
देशात करोनाचा संसर्ग झपाट्यानं पसरत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीनं लॉकडाउनची घोषणा केली. त्याचबरोबर हा संकटाचा काळ असून कुणीही घराबाहेर पडू नये. गर्दीचे कार्यक्रम टाळा असं आवाहन मोदी यांनी केलं होतं. पण, भाजपा आमदारानेच लॉकडाउनला ठेंगा दाखवला आहे. कळस म्हणजे तीन हजार पाहुण्यांमध्ये कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांची विशेष उपस्थिती होती. करोनाचं संकट टळेपर्यंत लग्न सोहळे आयोजित करून नका, असं आवाहन करणाऱ्या येडियुरप्पा यांच्यावर आता टीका होऊ लागली आहे.
देशात लॉकडाउन लागू झाल्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी राज्यातील जनतेला सर्व लग्न सोहळे पुढे ढकलण्याचं आवाहन केलं होतं. हे संकट टळेपर्यंत विवाह टाळावे, असं त्यांनी म्हटलं होतं. तेच येडियुरप्पा आता चर्चेत आले आहेत. कर्नाटकातील भाजपाचे आमदार महंतेश कवतागिमठ यांनी आपल्या मुलीचं थाटात लग्न लावून दिलं. बेळगावमध्ये रविवारी हा लग्नसोहळा पार पडला. ‘द हिंदू’ दैनिकानं यासंदर्भात वृत्त दिलं आहे. बेळगावमधील उदयबाग औद्योगिक वसाहत परिसरात असलेल्या शगुन गार्डन लॉन्सवर हा सोहळा पार पडला. या सोहळ्या तब्बल ३००० लोक उपस्थित होते, तेथे ड्यूटीवर असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्यांनं सांगितलं.
News English Summary: Prime Minister Narendra Modi immediately announced the lock down as the coronary infection spread rapidly in the country. Also, it is a time of crisis and nobody should leave the house. Modi appealed to the crowd to abstain. But, BJP MLA has shown the lockdown. The climax is that of Karnataka Chief Minister B.S. Yeddyurappa had a special presence. Yeddyurappa, who appealed that Karona should not hold a wedding ceremony till the crisis is over, has now been criticized. After the lock down is implemented in the country, Karnataka Chief Minister B.S. Yeddyurappa had urged the people of the state to postpone all the wedding celebrations. He said marriage should be avoided till this crisis is resolved. That is what Yeddyurappa has come up for discussion. Karnataka BJP MLA Mahantesh Kavatagimuth married his daughter in a theater The wedding was held on Sunday in Belgaum. The Hindu Daily has reported on this. The ceremony took place on the Shagun Garden Lawns in the Udaybagh Industrial Estate area of Belgaum. About 3000 people attended the event, a police officer on duty said.
News English Title: Story Corona virus in India lock down in India Karnataka Chief Minister attends grand wedding despite restrictions due to Covid 19 News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार