15 January 2025 5:40 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, मिळेल 45 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL RattanIndia Power Share Price | 12 रुपयाचा शेअर खरेदीला गर्दी, तुफान तेजी, यापूर्वी 502% परतावा दिला - NSE: RTNPOWER Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांना सुद्धा श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, डिटेल्स सेव्ह करून ठेवा
x

...अन्यथा दिसताक्षणीच गोळ्या घालू, तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांचा गंभीर इशारा

Telangana Corona Crisis, Shoot At Sight, CM K Chandrashekar Rao

अमरावती, २५ मार्च : कोरोना विषाणूविरोधात युद्ध लढत असलेल्या भारतात आजपासून २१ दिवसाचे लॉकडाऊन सुरु झाले. याचदरम्यान तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी लॉकडाऊनची अंमलबजावणी न करणाऱ्यांना कडक शब्दांत इशारा दिला आहे. लॉकडाऊन काळात घराबाहेर पडल्यास दिसताक्षणीच गोळ्या घालण्याचे आदेश (शूट ऍट साईट) देण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नाही, असा निर्वाणीचा इशाराच त्यांनी दिला आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री चंद्रशेखर राव म्हणाले की, जर नागरिक लॉकडाऊनच्या आदेशाचे उल्लंघन करत राहिले तर मला २४ तासांच्या संचारबंदीचे आदेश द्यावे लागतील. माझ्यासमोर अशी परिस्थिती निर्माण करु नका, जेणेकरुन मला पोलिसांना दिसताक्षणीच गोळ्या घालण्याचा आदेश देण्याशिवाय पर्याय राहणार नाही. सोमवारी आणि मंगळवारी लॉकडाऊन असतानाही नागरिक बाहेर आल्याने चंद्रशेखर राव नाराज आहेत.

तेलंगणामध्ये ३६ जण कोरोनाची लागण झालेले रुग्ण आढळले आहेत. तर राज्यातील १९ हजारहून अधिक लोकांवर प्रशासनाची नजर आहे. कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव टाळण्यासाठी तेलंगणा सरकारनं केंद्राच्या निर्देशाची अंमलबजावणी केली आहे. देशभरात सर्व ठिकाणी लॉकडाऊन आहे. अत्यावश्यक सेवा सुरू आहेत. मात्र तरीही नागरिकांनी घराबाहेर पडू नये असा इशारा तेलंगणा सरकारनं दिला आहे.

लोक जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी बाहेर येतात पण नियंमांचं पालन करत नाहीत. गर्दी करतात त्यामुळे अनेक शहरांमध्ये दुकानाबाहेर चौकोनी बॉक्स लोकांना उभं राहण्यासाठी आखण्यात आले आहेत. मात्र तेलंगणामध्ये सरकारनं घराबाहेर पडूच नये असा इशारा दिल्यानं नागरिकांच्या मनातही आता धास्ती आहे. आधीच कोरोनाची भीती आणि मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर लोकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.

 

News English Summery:  The 21-day lock down begins today in India battling the Corona virus. Meanwhile, Telangana Chief Minister K Chandrasekhar Rao has warned sternly against those who do not implement the lock down. “I have no choice but to give a shoot order immediately when I leave my house when I am locked out,” he said. Speaking to the media, Chief Minister Chandrasekhar Rao said that if the citizens continue to violate the lock down order, I will have to order 24-hour communication. Do not create such a situation in front of me, so that I have no choice but to order the police to fire at the police. Chandrasekhar Rao is angry with the citizens coming out despite lock down on Monday and Tuesday.

 

News English Title:  Story corona virus in Telangana Chief Minister K Chandrashekar Rao says Lock down violators could be shot at sight News latest Updates.

हॅशटॅग्स

#Telangana(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x