20 April 2025 8:42 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत, मल्टिबॅगर इरेडा शेअर देईल मजबूत परतावा, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: IREDA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 21 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | बापरे, तब्बल 1,33,786% परतावा दिला या शेअरने, पुन्हा तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर ऑटो कंपनीचा शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: ASHOKLEY Vodafone Idea Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँकेच्या नफ्यात प्रचंड वाढ, पण तज्ज्ञांनी पेनी स्टॉकबद्दल काय म्हटलं? टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK Vedanta Share Price | या शेअरला मोठा भविष्यकाळ, खरेदी करून ठेवा, अनेक तज्ज्ञांनी दिला सल्ला - NSE: VEDL
x

देशात गेल्या २४ तासात ३५४ नवीन कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण: केंद्रीय आरोग्य मंत्रालय

Corona Crisis, Covid19

नवी दिल्ली, ७ एप्रिल: देशातील कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढू लागला आहे. दिल्लीतील निजामुद्दीन येथील तबलिगी जमातच्या धार्मिक कार्यक्रमात संक्रमित लोक सहभागी झाल्यानंतर कोरोना बाधितांचा आकडा झपाट्याने वाढत असल्याचे बोलले जात आहे. देशात गेल्या २४ तासात ३५४ नवीन कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची ओळख पटली आहे. यापार्श्वभूमीवर सोमवारी देशाच्या वेगवेगळ्या भागांत जमातमधील लोकांना आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या जवळपास २५ हजार 500 लोकांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे.

देशात गेल्या २४ तासात ३५४ नवीन कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ४४२१ वर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यु झालेल्यांचा आकडा ११४ वर पोहोचला आहे. देशातील ४४२१ कोरोनाग्रस्त रुग्णांपैकी ३९८१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर ३२५ रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

दुसरीकडे, धारावीत आज आणखी दोन नवे रुग्ण आढळले आहेत. एकाच कुटुंबातील दोघांना म्हणजे बापलेकांना करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे धारावीतील करोना रुग्णांची संख्या ७वर पोहोचली आहे. आज राज्यात २३ नवे रुग्ण वाढल्याने राज्यातील रुग्णांची एकूण संख्या ८९१वर गेली आहे.

 

News English Summary: The number of coronary disorders in the country is increasing day by day. The number of corona sufferers is reported to be increasing steadily after infected people participate in a religious program of the Tabligi tribe in Nizamuddin, Delhi. In the last 24 hours, 354 new corona-positive patients have been identified in the country. On this backdrop, on Monday, people of Jamaat and around 25 thousand 500 people who came in contact with them were kept in isolation in different parts of the country.

 

News English Title: Story corona virus increased number covid19 patients country 4421 354 New patients last 24 hours News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या