15 January 2025 4:03 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: IREDA Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO Quant Mutual Fund | पगारदारांनो, टॅक्स वाचेल आणि पैसा 3 ते 4 पटीने वाढेल, ही म्युच्युअल फंड योजना मालामाल करेल IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड सह डिटेल्स नोट करा, कमाईची संधी सोडू नका 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी
x

कोरोना विषाणूमुळे २० दिवसाच्या बाळाचा मृत्यू; जगातील कमी वयाचा रुग्ण

Covid 19, Corona Crisis, Maharashtra

जयपूर, २ मे: राजस्थानच्या जयपूरमध्ये कोरोना संबंधित दुःखद घटना घडली आहे. येथे कोरोना विषाणूमुळे एका २० दिवसाच्या बाळाचा मृत्यू झाला आहे. जयपूरच्या चांदपोल भागात, कोरोना विषाणूच्या संसर्गाची लक्षणे दिसताच शुक्रवारी एका २० दिवसाच्या मुलाला जेके लोन रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण सर्व प्रयत्न निरुपयोगी ठरले आहेत. या निरागस बाळाचा त्याच दिवशी कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाल्याचं वृत्त आहे.

मिळालेल्या माहितीनुसार कोरोना विषाणूमुळे मृत्यू होणारा तो जगातील वयाने सर्वात लहान रुग्ण आहे. काल म्हणजे शनिवारी राजस्थानमध्ये कोरोना विषाणूमुळे आणखी तीन जणांचा मृत्यू झाला आहे. अशा परिस्थितीत राज्यात एकूण मृतांचा आकडा आता ६५ वर पोहोचला आहे. दरम्यान, कोरोना विषाणूची आणखी ५४ नवी प्रकरणं समोर आली आहेत. सध्या राज्यात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या २,७२० झाली आहे. दिवसभरात कोरोना विषाणूमुळे जयपूरमध्ये दोन आणि जोधपूरमध्ये एकाचा मृत्यू झाला.

सदर विषयाला अनुसरून यापूर्वी प्रशासनाने चुकून सांगितले गेले होते की कोरोना व्हायरसमुळे १५ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. मात्र, त्यात संध्याकाळी त्यात सुधारणा करण्यात आली.

 

News English Summary: A tragic incident related to Corona has taken place in Jaipur, Rajasthan. Here a 20-day-old baby has died from the corona virus. In the Chandpol area of Jaipur, a 20-day-old boy was admitted to JK Lone Hospital on Friday after showing signs of corona virus infection, but all efforts have been in vain.

News English Title: Story corona virus killed the world youngest patient 20 day old child dies covid 19 News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x