गुजरात-मध्यप्रदेशात L स्ट्रेन कोरोना व्हायरस; परिणामी मृत्युदर अधिक: संशोधन
गांधीनगर, २६ एप्रिल: भारतामध्ये कोरोना विषाणूचा विळखा वाढत चालला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, भारतामध्ये कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा २७ हजारांवर पोहचला आहे. तर आतापर्यंत ८७२ कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त कोरोनाचे रुग्ण आहेत.
गुजरातमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. मागील २४ तासांमध्ये कोरोनाचे २३० नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे गुजरातमधील कोरोनाबाधितांचा आकडा ३ हजार ३०१ वर पोहचला आहे. तर गेल्या २४ तासांत १८ रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे गुजरातमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा १५१ वर पोहचला आहे.
दरम्यान, राज्यांमधील कोरोनाव्हायरसची परिस्थिती पाहता या राज्यांमध्ये कोरोनाव्हायरसचा घातक स्ट्रेन सक्रिय झाल्याची शक्यता वर्तवली जाते आहे. यामध्ये गुजरात आणि मध्य प्रदेश या राज्यांचा समावेश आहे. गुजरात आणि मध्य प्रदेशमध्ये कोरोनाव्हायरस रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे. अशात गुजरात बायोटेक्नोलॉजी रिसर्च सेंटरने नुकत्याच केलेल्या एका संशोधनानुसार, चीनच्या वुहानमध्ये जो घातक असा L टाइप (L strain) कोरोनाव्हायरस दिसून आला तोच गुजरातमध्येही आहे आणि गुजरामधील मृत्यूदर जास्त असण्यामागे हेच कारण असू शकतं. तर दुसरीकडे केरळमध्ये कोरोनाव्हायरसचा S स्ट्रेन (S strain) दिसून आहे, जो L पेक्षा कमजोर आहे आणि त्यामुळेच केरळमधील मृत्यूदर कमी असण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.
GBRC चे संचालक सीजी जोशी यांनी ‘द हिंदू’शी बोलताना सांगितलं की, “L स्ट्रेन व्हायरसचा S टाइप स्ट्रेन पेक्षा जास्त घातक असतो. जगभरात ज्या ठिकाणी कोरोनाव्हायरसमुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण जास्त आहे, तिथं हाच स्ट्रेन सापडला आहे”. केरळमध्ये दुबईहून आलेल्या व्हायरसचा प्रसार झाला आहे, जिथं S स्ट्रेनची जास्त प्रकरणं आहेत. तर इटली आणि फ्रान्समध्ये L स्ट्रेनवाले रुग्ण जास्त होते, या ठिकाणाहून भारतात परतलेल्या भारतीयांसह L स्ट्रेन टाइप आला. आणखी एक स्ट्रेन न्यूयॉर्कमध्ये दिसून आला, ज्यावर शास्त्रज्ञांचा अभ्यास अद्याप सुरू आहे.
पेकिंग युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ लाइफ सायन्सेस आणि शांघाई युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी १०३ रुग्णांच्या नमुन्यांचा अभ्यास केला, ज्यामध्ये त्यांना कोरोनाव्हायरसचे २ प्रकार दिसून आले, त्याला त्यांनी L आणि S अशी नावं दिली. याच्या लक्षणांमध्येही बराच फरक आहे.
तज्ज्ञांच्या मते, गुजरात आणि मध्य प्रदेशमध्ये कोरोनाव्हायरसचा L स्ट्रेन जास्त प्रभावी आहे आणि यामुळेच गुजरात, मध्य प्रदेशमध्ये मृत्यूदर जास्त आहे. महात्मा गांधी मेमोरिअल मेडिकल कॉलेजचे डीन ज्योती बिंदल यांच्या मते, इंदोरमध्येही हाच व्हायरस जास्त दिसून येतो आहे आणि हेच तपासण्यासाठी कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचे 57 नमुने पुण्याच्या नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ व्हायरोलॉजीमध्ये पाठवण्यात येत आहेत.
दुसरीकडे, कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. सध्या दोन सरकारी संस्था देशातील कोरोनाव्हायरसच्या रुग्णांची संख्या आणि मृत्यू यावर लक्ष ठेवून आहेत. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि नॅशनल कोआपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉरपोरेशन या दोन्ही संस्था कोरोनाची आकडेवारी आपल्यापर्यंत पोहोचवतात. परंतु, या दोन संस्थांनी दिलेली आकडेवारी जुळत नाहीये.
News English Summary: The deadly L type (L strain) corona virus found in Wuhan, China is also present in Gujarat and this may be the reason behind the high mortality rate in Gujarat. Kerala, on the other hand, has an S strain of corona virus, which is weaker than L and is therefore likely to have a lower mortality rate in Kerala.
News English Title: Story Corona virus L strain in Gujarat and Madhya Pradesh states Covid 19 News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Natural Farming | कृषीराजा सुखावणार; केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, 'राष्ट्रीय प्राकृतिक शेती मिशनला' मिळाली मंजुरी
- PAN 2.0 QR CODE | आता पॅन कार्ड होणार PAN QR CODE कार्ड; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, अपडेट नोट करा - Marathi News
- Post Office Interest | पोस्टाच्या 'या' 9 योजनांवर मिळते धमाकेदार व्याज, 10 रुपयांपासून देखील सुरू करू शकता गुंतवणूक
- Post Office MIS | पोस्टाची भन्नाट योजना; प्रत्येक महिन्याला कमवाल 9,250 रुपये, जाणून घ्या पोस्टाच्या योजनेचे फायदे - Marathi News
- SIP Calculator | आता सहज कमवता येतील 5 कोटी, गुंतवणुकीची 'ही' चाल बनवेल कोट्याधीश, कॅल्क्युलेशन पहा - Marathi News
- Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News
- Smart Investment | केवळ 150 रुपये वाचवून आपल्या मुलाचं भविष्य सुरक्षित करा, पैसे बचतीतून होईल लाखोंची कमाई
- Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेतलंय का, लवकरात लवकर लोन फेडण्याची टेकनिक आहे कमालीची - Marathi News
- Job Opportunity | तरुणांनो लाखोंच्या घरात पगार घेण्याची वेळ आली; ITBT मध्ये 526 जागांसाठी मेगा भरती सुरू, पटापट अर्ज करा
- Credit Score | पगारदारांनो, तुमचा क्रेडिट स्कोर 750 असून सुद्धा लोन मिळणार नाही, जाणून घ्या नेमके कारण काय असेल