राष्ट्रीय महामार्गावर येत्या सोमवारपासून पुन्हा टोलवसुली; केंद्राकडून मजुरी
नवी दिल्ली, १८ एप्रिल: येत्या सोमवार, २० एप्रिलपासून देशातील राष्ट्रीय महामार्गांवरील टोलवसुली पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण त्यासाठी आवश्यक मार्गदर्शक सूचना तयार करण्याच्या अंतिम टप्प्यात आहे. देशात कोरोना विषाणूचा प्रतिकार करण्यासाठी २५ मार्चला लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. तेव्हापासून राष्ट्रीय महामार्गांवरील टोलवसुली तात्पुरती बंद करण्यात आली होती. जीवनावश्यक वस्तू सुरळीतपणे सर्व राज्यांना मिळाव्यात, यासाठी त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला होता.
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला लिहिलेल्या पत्रामध्ये म्हटलं आहे की, केंद्रीय गृहमंत्रालयाकडून सर्व ट्रक आणि मालवाहू वाहनांना राज्यांतर्गत आणि आंतरराज्यीय वाहतुकीसाठी जी सुट देण्यात आली आहे ती ध्यानात घेऊन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं नियमांचं पालन न करणाऱ्या वाहन चालकांवर योग्य ती कारवाई करावी. तसंच २० एप्रिल २०२० पासून टोलवसूली सुरू करण्यात आली पाहिजे. फायनॅन्शिअल एक्स्प्रेसनं पीटीआयच्या हवाल्यानं हे वृत्त दिलं आहे.
दरम्यान, अखिल भारतीय मोटर ट्रान्सपोर्ट कॉंग्रेसने केंद्र सरकारला टोलवसुली पुन्हा सुरू करण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्यास सांगितले आहे. ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट कॉंग्रेस (एआयएमटीसी)चे अध्यक्ष कुलतरणसिंग अटवाल यांनी याचा निषेध नोंदवला आहे. ते म्हणाले, या क्षेत्रावर कोणताही आर्थिक भार टाकण्यापूर्वी सरकारने आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा. लॉकडाऊनमुळे आधीच या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात घसरण झालेली आहे.
News English Summary: Starting next Monday, April 20, toll duty on national highways will be resumed. The National Highway Authority is in the final stages of preparing the necessary guidelines. The lockdown was implemented on March 25 in the country to combat the Corona virus. Since then, toll duty on national highways was temporarily closed. The decision was taken at that time to ensure that all the essential commodities were easily available to all the states.
News English Title: Story Corona virus NHAI resume toll collection national highways April 20 Covid19 News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Diwali 2024 | आपण दिवाळी सण साजरा करतो, परंतु दिवाळीच्या या 4 दिवसांचे महत्व माहित आहे का, जाणून घ्या संपूर्ण माहिती
- Sangram And Khushboo | संग्रामने हटके अंदाजात मारला होता लग्नाचा प्रपोज, म्हणाला 'माझ्यासोबत म्हातारं व्हायला आवडेल का तुला'
- Ather E Scooter | यंदाची दिवाळी एथर EV स्कूटरने खास बनवा, फीचर्स ऐकून चकित व्हाल आणि लगेच खरेदी करा - Marathi News
- Surabhi Jyoti Wedding | टेलिव्हिजन स्टार सुरभी ज्योती अडकली लग्न बंधनात, निसर्गरम्य वातावरणात थाटामाटात पार पडायला लग्नसोहळा
- Lakshmi Pujan | लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या चूका टाळा; जीवनात भरभराट येईल, सोबतच काही गोष्टी काटेकोरपणे पाळा
- Apollo Micro Systems Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, फायद्याची अपडेट, यापूर्वी 1380% परतावा दिला - NSE: APOLLO
- Suraj Chauhan | मोहब्बते लुटाऊंगा, बीबी हाऊसमधून बाहेर आल्यानंतर गुलीगतची पहिली रील वायरल, ती सुद्धा लाडक्या मित्राच्या गाण्यावर
- Suzlon Share Price | सुझलॉन कंपनी बाबत मोठी अपडेट, शेअर होणार रॉकेट, यापूर्वी दिला मल्टिबॅगर परतावा - NSE: Suzlon
- Post Office Saving Scheme | पोस्टाच्या योजनेत पैसे गुंतवता, पण कोणत्या योजनेत टॅक्स माफ असतो हे 90% लोकांना माहित नसतं
- Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स शेअरमध्ये तेजीत संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, कमाईची संधी - NSE: APOLLO