22 November 2024 10:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS
x

देशाची लोकसंख्या १३५ कोटी, व्हेंटिलेटर फक्त ४० हजार; सरकार किती सतर्क?

News Latest Updates, Corona Crisis

नवी दिल्ली, २४ मार्च:  महाराष्ट्रातील पहिला कोरोनाग्रस्त सापडून १५ दिवस झाले, तरी इंटर्न डॉक्टरांसाठी पुरेसे मास्क, सँनिटायझर उपलब्ध नाहीत, असा दावा पुण्याच्या डॉक्टर तरुणीने ट्वीटरवर केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना उद्देशून ९ ट्वीट डॉ. श्वेता यांनी केले आहेत.

कोरोना संशयित रुग्णांसाठी सिव्हीलमध्ये विलगीकरण कक्ष कार्यान्वित केला गेला. इथल्या संशयित रुग्णांचं sampling चं काम इंटर्नकडेच. सर्जिकल मास्क, सँनिटायझर यांचा तुटवडा आहे किंवा N95 मास्क्स अजूनही उपलब्ध नाहीत. अशा परिस्थितीतही कोणी काम टाळलं नाही, असं त्यांनी म्हटलं आहे आणि ही आहे राज्यातील आरोग्य व्यवस्थेची स्थिती तर देशातील वास्तव काय असेल याचा विचार करा.

कोरोना विषाणूमुळे देशभरातील वैद्यकीय सेवा गतिमान करण्यात आली आहे. विविध ठिकाणी रुग्णालयांमध्ये यासाठी आयसोलेशन वॉर्ड (विलिगीकरण कक्ष) उभारण्यात आले आहेत. याचदरम्यान रुग्णालयांमध्ये आवश्यक उपकरणांची कमतरता पाहण्यास मिळत आहे. भारतात केवळ ४० हजार व्हेंटिलेटर आहेत. याचा उपयोग गंभीर रुग्णांवर उपचार केला जात आहे.

देशातील व्हेंटिलेटरच्या उपलब्धतेबाबत हा अंदाज इंडियन सोसायटी ऑफ क्रिटिकल केअरने नोंदवला आहे. काही तज्ज्ञांच्या मते सर्वसोयींनी युक्त रुग्णालयांची संख्या कोरोनाच्या गंभीर रुग्णांवर उपचार करण्यास अपुरी ठरु शकते. आतापर्यंत चीनसमवेत जगभरात जे कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत, त्यातील ५ टक्के रुग्णांना श्वास घेण्यास गंभीर अडचणी येत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर आयसीयूमध्येच उपचार केले जाऊ शकतात.

भारतातही दररोज कोरोना संक्रमित रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. तज्ज्ञांच्या मते भारतातील कोरोना संक्रमण हे तिसऱ्या टप्प्यात पोहोचले आहे. या टप्प्यात संक्रमण वेगाने पसरण्याचा धोका आहे. संक्रमणातील अशी वाढ इटली आणि इराणमध्ये पाहायला मिळाली होती. त्यानंतर तेथील रुग्णालयांमध्ये व्हेंटिलेटरवर उपचार करण्याची गरज असलेल्या रुग्णांमध्ये वाढ झाली होती आणि तेथील परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली होती. दरम्यान, व्हेंटिलेटर तयार करण्यासाठी सरकारला मोठा खर्च करावा लागणार आहे. एका व्हेंटिलेटरची किंमत सुमारे ८ ते १० लाख रुपये असते.

इंडियन सोसायटी ऑफ क्रिटिकल केअरचे अध्यक्ष डॉ. ध्रुव चौधरी यांच्या मते, देशात सुमारे ४० हजार व्हेंटिलेटर सक्रिय आहेत. ती पण बहुतांश सरकारी वैद्यकीय महाविद्यालये, मेट्रो शहरांतील खासगी रुग्णालये आणि सेमी मेट्रो शहरातील रुग्णालयातच उपलब्ध आहेत.

 

News English Summery:  Medical care has been rampant across the country due to the corona virus. Isolation wards have been set up for hospitals in various places. Meanwhile, hospitals are seeing a shortage of equipment. There are only 40,000 ventilators in India. It is being used to treat serious patients. This estimate has been reported by the Indian Society of Critical Care about the availability of ventilators in the country. According to some experts, the number of hospitals in general may be insufficient to treat serious coronary patients. So far, 5 percent of the coronary patients that are found worldwide with China have serious breathing difficulties. Therefore, they can be treated in the ICU only. In the meantime, the government will have to spend big to build the ventilator. A ventilator costs around Rs 8-10 lakh. President of the Indian Society of Critical Care. According to Dhruv Choudhary, there are about 40,000 ventilators active in the country. They are also available at most government medical colleges, private hospitals in metro cities and semi-metro city hospitals.

 

News English Title:  Story corona virus only 40 thousand ventilators in India at a population of 135 crores News Latest Updates.

हॅशटॅग्स

#india(222)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x