22 November 2024 9:47 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

संकटाच्या निमित्ताने सुरु केलेल्या PM केअर्सचं ऑडिट गरजेचं - राहुल गांधी

Corona Crisis, PM Care Funds, Rahul Gandhi, Audit of PM Care Funds

नवी दिल्ली, ८ मे: देशव्यापी लॉकडाऊन समाप्त करण्याच्या योजनेबाबत केंद्र सरकारने पारदर्शकता दाखवण्याची आवश्यकता असल्याचे असे मत कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी व्यक्त केले आहे. देशातील परिस्थिती लवकर नियंत्रणात आणायची असेल तर विविध राज्यांमधील मुख्यमंत्र्यांवर केंद्र सरकारने विश्वास ठेवण्याचीही गरज आहे, असे राहुल गांधी म्हणाले.

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आलेल्या पीएम केअर्सचं ऑडिट होण्याची गरज असल्याचं राहुल गांधी म्हणाले. ‘पीएम केअर्सचं ऑडिट आवश्यक आहे. पीएम केअर्समधला किती पैसा खर्च झाला आणि त्यात किती पैसा यायला हवा, हे जनतेला कळायला हवं,’ असं राहुल गांधींनी म्हटलं. पीएम केअर्समध्ये जमा होणारा निधी, त्याचा खर्च याबद्दल पारदर्शकता गरजेची असल्याचं ते म्हणाले.

सर्वप्रथम या लॉकडाऊनची मोठी झळ बसलेल्या लोकांना तात्काळ मदत पुरविली पाहिजे. अन्यथा आपण काहीच करु शकणार नाही. काँग्रेसने आखलेल्या न्याय योजनेप्रमाणे या लोकांच्या बँक खात्यांमध्ये तात्काळ पैसे जमा केले पाहिजेत. स्थलांतरित कामगार, गरीब आणि लघुद्योगांना आजच आर्थिक मदत केली पाहिजे. नंतर वेळ निघून गेल्यावर मदत करून काही फायदा होणार नाही. कारण, या उद्योगांना आर्थिक मदत न केल्यास देशात बेरोजगारीची त्सुनामी येईल, अशी भीती राहुल गांधी यांनी व्यक्त केली.

लोकांच्या मनात कोरोनाबद्दल भीती आहे आणि ती भीती दूर करण्यात सरकार अपयशी ठरत आहे, अशा शब्दांत राहुल यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. लॉकडाऊन नेमका कधीपर्यंत चालणार, हे सरकारनं स्पष्टपणे सांगायला हवं. कोरोना संकट केवळ एक टक्के जनतेसाठी धोकादायक आहे. मात्र ९९ टक्के लोकांच्या मनात त्याची भीती आहे. ही भीती सरकारनं दूर करण्याची गरज असल्याचं राहुल म्हणाले.

 

News English Summary: Rahul Gandhi said that PM Cares, which was set up in the wake of the Corona crisis, needed to be audited. ‘PM Care needs an audit. The people should know how much money was spent on PM care and how much money should come in it, ‘said Rahul Gandhi.

News English Title: Story corona virus PM Cares Fund should be transparent says MP Rahul Gandhi News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x