इस्पितळात सुद्धा त्यांनी सोशल डिस्टन्सिंग नियम धुडकावला; समूहाने नमाज पठण
हैदराबाद, २ एप्रिल: देशात गेल्या २४ तासांत करोनाचे ३८६ रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या १६३७ वर पोहोचली असून, आतापर्यंत १३२ रुग्ण बरे झाले आहेत. एका दिवसातील नव्या रुग्णांचा हा सर्वात मोठा आकडा असला तरी तो मुख्यत्वे तबलिगी जमातच्या अनुयायांना झालेल्या बाधेमुळे वाढला आहे. हा देशव्यापी आलेख नसल्याची माहिती बुधवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली. आत्तापर्यंत ४७,९५१ वैद्यकीय चाचण्या झाल्या असून, सरकारी वैद्यकीय प्रयोगशाळांमध्ये ४५६२ चाचण्या करण्यात आल्या आहेत.
देशात कोरोना विषाणूचे रुग्ण वाढत असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने मोठ्या संख्येने लोकांना क्वारंटाइन केले जात आहे. तेलंगणातही अशीच काहीशी स्थिती आहे. परंतु, येथे क्वारंटाइन करण्यात आलेल्या मुस्लिम समाजातील लोकांकडून रुग्णालयातच नमाज अदा करण्यात येत असल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली आहे. हे प्रकरण हैदराबादमधील गांधी रुग्णालयातील आहे. या रुग्णालयात काही कोरोना संशयित मुस्लिम युवकांचे क्वारंटाइन करण्यात आले आहे. यातील काही रुग्णांनी तिथेच एकत्र येत नमाज अदा केली. विशेष म्हणजे सरकारने कोरोना विषाणूचा फैलाव होऊ नये म्हणून लोकांना एकत्र येण्यास बंदी घातली आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पण, नागरिकांकडून याला हरताळ फासला जात आहे.
Telangana: People who are under quarantine at Gandhi Hospital in Hyderabad offer namaaz. #COVID19 pic.twitter.com/oT2i3OmW5J
— ANI (@ANI) April 2, 2020
दरम्यान, हैदराबादमधील गांधी सरकारी रुग्णालयात कोरोना विषाणूची लागण झालेल्या ४९ वर्षीय व्यक्तीचा बुधवारी मृत्यू झाला. रुग्णालयाचे अधिक्षक श्रवण कुमार म्हणाले की, मृत व्यक्तीने दिल्लीचा प्रवास केला होता. त्याला पाच दिवसांपूर्वी दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर कोरोना विषाणूचे उपचार सुरु होते. त्यातच त्याचा मृत्यू झाला. या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या नातेवाईकांनी रुग्णालयात तैनात डॉक्टरांना आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केली. पोलिसांनी नंतर रुग्णालयाची सुरक्षा वाढवली.
News English Summary: As the number of Corona virus patients is increasing in the country, a large number of people are being quarantined for safety. There is a similar situation in Telangana. However, news has been sparked by the fact that the Quarantine Muslim community is offering prayers at the hospital itself. This case is from Gandhi hospital in Hyderabad. Quarantine of Muslim corps of some corona suspects has been made at this hospital. Some of these patients performed prayers together there. In particular, the government has banned people from coming together to prevent the spread of the corona virus. It is advisable to follow social distance. However, it is being hanged by citizens.
News English Title: Story Corona virus Telangana people who are under quarantine at Gandhi hospital in Hyderabad offer Namaaz News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News