आपल्याला कोरोनासोबत जगण्याची सवयच करावी लागेल - डॉ. रणदीप गुलेरिया
नवी दिल्ली, ५ मे: कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. जगभरात आतापर्यंत ३६ लाख ४२ हजार ०६६ लोकांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला आहे. यापैकी २ लाख ५२ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ११ लाख ९३ हजार लोक कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच मागील २४ तासांमध्ये ७८३७७ नवे कोरोनाचे रूग्ण आढळून आले आहेत. तर ३८७७ लोकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे.
पाच महिन्यांनंतरही यावर लस निर्माण होत होत नसल्याने शास्त्रज्ञ, एका नवीन निष्कर्षावर पोहचले आहेत. आता माणसांना या विषाणूसह जगण्याची सवय करुन घ्यावी लागेल असं संशोधकांकडून सांगण्यात आलं आहे. जगभरातील अनेक कंपन्या कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी अनेक ऍन्टी-फ्लू लसी तयार करण्याच्या प्रयत्नात आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, जवळपास 90हून अधिक संस्था आणि कंपन्या कोरोना व्हायरसवर लस निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. परंतु, क्लिनिकल चाचण्या पूर्ण न केल्यामुळे, या लसींचे कोणतेही निकाल समोर आलेले नाहीत.
ऑल इंडिया इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सचे (एम्स) संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी, आता आपल्याला कोरोना व्हायरससोबत जगण्याची सवयच करावी लागेल, असं सांगितलंय. जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक डॉक्टर आणि संशोधकांनी येणाऱ्या काळात कोरोनावरील लस तयार करण्यास अवधी लागू शकत असल्याचं सांगितलं. त्यामुळे कोरोना व्हायरसपासून स्वत:चा बचाव करणं हा त्यावरील एकमेव उपाय असल्याचं सांगण्यात आलं आहे.
दुसरीकडे कोरोनाच्या उपचारासाठी लसीची चाचणी देखील अनेक देशात करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत जगभरातील सर्व देश सध्या कोरोनावर लस शोधण्याच्या प्रयत्नांत आहेत. दरम्यान इस्रायल जगातील अशा देशांमध्ये सामील झाला आहे जो कोव्हिड-19विरुद्धच्या युद्धात आशेचा किरण दाखवत आहे. एप्रिलमध्ये इस्रायलमधील शास्त्रज्ञांनी कोरोना लसीचा शोध घेण्यास सुरुवात केली, दरम्यान त्यांना आता मोठा शोध लागल्याचे इस्त्रायली संरक्षण मंत्रालयाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे.
इस्त्रायली संरक्षणमंत्री आणि इस्रायल इन्स्टिट्यूट फॉर बायोलॉजिकल रिसर्च यांनी दिलेल्या संयुक्त निवेदनात, कोरोना विषाणूचा नाश करण्यारी कोरोना लस तयार करण्यात शास्त्रज्ञांना यश आल्याचे सांगितले आहे. तसचे, इस्रायलनं तयार केलेली ही लस कोरोनावर हल्ला करून रुग्णांच्या शरीरातून त्याचा प्रादुर्भाव कमी करेल. तसेच, या लसीचा शोध टप्पा संपला असून आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या मदतीनं अँटीबॉयटिक्स तयार केले जातील, इस्त्रायलचे संरक्षण मंत्री नफ्ताली बेनेट यांनी याबाबत माहिती दिली.
#BREAKING: Joint statement by the Israeli Ministery of Defense and the Israel Institute for Biological Research: A significant breakthrough has been achieved in finding an antidote to the Corona virus that attacks the virus and can neutralize it in the sick body
— Amichai Stein (@AmichaiStein1) May 4, 2020
News English Summary: All India Institute of Medical Sciences (AIIMS) Director Dr. Randeep Guleria “Now we have to get used to living with the corona virus,” said Randeep Guleria. According to experts, many doctors and researchers have suggested that it may take some time before the coronavirus vaccine is developed. Therefore, the only solution is to protect yourself from the corona virus.
News English Title: Story covid 19 this is the only option until the vaccine is found on corona virus pandemic says Randeep Guleria News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS