22 January 2025 10:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंडाची योजना, मिळेल तगडा परतावा, इथे पैसा वेगाने वाढतो SBI Mutual Fund | नोकरदारांनो बँक FD विसरा, 'या' म्युच्युअल फंड योजना 31 टक्केपर्यंत परतावा देत पैशाने पैसा वाढवतील Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, स्टॉक BUY करावा का - NSE: TATASTEEL Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप कंपनीच्या नफ्यात घट, तरीही ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH Penny Stocks | प्राईस 88 पैसे, एका वडापावच्या किंमतीत 20 शेअर्स खरेदी करा, यापूर्वी 633% परतावा दिला - Penny Stocks 2025 Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनी शेअरने 1 महिन्यात 53% परतावा दिला, खरेदीची संधी सोडू नका - NSE: APOLLO Infosys Share Price | आयटी स्टॉक इन्फोसिसवर टॉप ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मोठा परतावा देणार - NSE: INFY
x

मेलेनिया ट्रम्प यांची दिल्लीतील शाळांना भेट; केजरीवाल व सिसोदियांना वगळले

Delhi CM Arvind Kejriwal, Melania Trump, Manish Sosodia

नवी दिल्ली: अमेरिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारत दौऱ्यावर येणार असल्याने अहमदाबाद पासून ते आगरा पर्यंत जोरदार तयारी करण्यात येत आहे. अहमदाबाद येथील रस्ते सुद्धा सजवण्यात आले आहेत. तर मोटेरा स्टेडिअम येथे डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन सुद्धा करण्यात आले आहे. याच दरम्यान शुक्रवारी अहमदाबाद विमानतळावर डोनाल्ड ट्रम्प यांच्या सुरक्षिततेसाठी कडक बंदोबस्त करण्यात येणार आहे. तर आज विमानतळाच्या बाहेर मॉक ड्रिल सुद्धा झाले. ट्रम्प यांच्या दौऱ्यादरम्यान त्यांची सुरक्षितता पाहता अहमदाबाद विमानतळावरील अधिकाऱ्यांनी सर्व कर्मचाऱ्यांची दोन दिवसांची सुट्टी २४-२५ फेब्रुवारीला रद्द करण्यात आली आहे. पोलिसांना हे कर्मचारी ट्रम्प यांच्या दौऱ्यादरम्यान मदत करणार आहेत.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या पत्नी मेलेनिया हे २४ आणि २५ फेब्रुवारी रोजी अहमदाबाद, आग्रा आणि नवी दिल्लीला भेट देणार आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या सन्मानार्थ ‘नमस्ते ट्रम्प’ कार्यक्रम अहमदाबादमधील मोटेरा स्टेडियमवर आयोजित करण्यात आला आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नी मेलेनिया यांच्याबरोबर दिल्लीतील सरकारी शाळांच्या दौऱ्यात आता मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया सहभागी होणार नाहीत. केंद्र सरकारने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे नाव कार्यक्रमातून हटवल्याचा आरोप आपमधील सूत्रांनी केला आहे. नियोजित कार्यक्रमानुसार मेलेनिया ट्रम्प यांच्याबरोबर हे दोन्ही नेते दौऱ्यात सहभागी होते. परंतु, नाव हटवल्यानंतर या कार्यक्रमाशी आपला काही संबंध नसल्याचे सरकारने म्हटले आहे.

२५ फेब्रुवारी रोजी मेलेनिया दक्षिण दिल्लीतील सरकारी शाळेत हॅप्पीनेस क्लास पाहायला जाणार आहेत. ट्रम्प आणि मोदी यांची जेव्हा बैठक सुरु असेल. त्यावेळी मेलेनिया या शाळेत असतील. केजरीवाल सरकारने २०१८ मध्ये दिल्लीतील शाळांमध्ये हॅप्पीनेस क्लासची सुरुवात केली होती. हा क्लास नर्सरीते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. मुलांना मानसिक तणावापासून दूर ठेवणे हा यामागचा उद्देश आहे. हॅप्पीनेस क्लासच्या मदतीने मुलांच्या वर्तणुकीत सकारात्मक बदल दिसून आले आहेत.

 

Web Title: Story Delhi Chief Minister Arvind Kejriwal Manish Sisodia dropped from Melania Trump School Event.

हॅशटॅग्स

#Arvind Kejariwal(39)#Donald Trump(89)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x