23 February 2025 1:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

दिल्ली हिंसाचार: भाजप नेत्यांवर ठपका ठेवणाऱ्या न्यायाधिशांची रातोरात बदली

Delhi Violence, Delhi High Court Judge S Muralidhar transfer, CAA

नवी दिल्ली: राजधानी दिल्लीत उसळलेल्या हिंसाचाराने आतापर्यंत ३० बळी घेतले आहेत. पोलिसांनी अटकसत्र सुरू केलं असून आतापर्यंत १०६ जणांना अटक केली आहे. या प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. भाजप नेत्यांच्या चिथावणीखोर वक्तव्यामुळे ही हिंसा झाल्याचं या याचिकेत म्हटलं आहे.

सरन्यायाधीश एस. ए. बोबडे यांच्या सल्ल्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दिल्ली हायकोर्टाचे न्यायाधीश एस. मुरलीधर यांची पंजाब आणि हरयाणा हायकोर्टात बदली केली आहे. राष्ट्रपतींनी न्यायाधीश मुरलीधरन यांना पंजाब आणि हरयाणा हायकोर्टात न्यायाधीश म्हणून काम पाहावे असे आदेश दिल्याचे त्या बाबतच्या अधिसूचनेत म्हटले आहे.

दरम्यान, या याचिकेवर सुनावणी करणाऱ्या न्यायाधिशांची रातोरात बदली करण्यात आली आहे. न्यायाधीश एस मुरलीधर हे या प्रकरणावर जज म्हणून सुनावणी करत होते. आज पोलीस आपली बाजू मांडणार आहेत. मात्र आजची सुनावणी होण्याआधीच मुरलीधर यांची रातोरात पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाचे जज म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अचानक न्या. मुरलीधर यांच्या झालेल्या बदलीमुळे चर्चांना उधाण आलं आहे. त्यामुळे आज दिल्ली उच्च न्यायालयातील आजच्या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

दिल्ली हिंसाचारप्रकरणी बुधवारी उच्च न्यायालयात पार पडलेल्या सुनावणी पार पडली. न्यायाधीश एस. मुरलीधर हे या प्रकरणावर न्यायाधीश म्हणून सुनावणी करत होते. त्यावेळी भाजप नेते तसेच दिल्ली पोलिसांवर ताशेरे ओढणाऱ्या दिल्ली हायकोर्टचे न्यायमूर्ती एस. मुरलीधर यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. त्यांची पंजाब आणि हरियाणा हायकोर्टात बदली करण्यात आली आहे. काल न्यायमूर्ती मुर्लीधर यांनीच कपिल मिश्रा, अनुराग ठाकूर आणि प्रवेश वर्मा यांच्यावर तातडीने एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले होते.

 

News English Summery: So far 30 victims have been killed in violence in capital Delhi. Police have launched arrests and 106 persons have been arrested so far. A petition has been filed in the Delhi High Court in this case. The petition said the violence was triggered by the provocative statements of BJP leaders. The judges hearing the petition have been transferred overnight. Judge S Muralidhar was hearing the matter as a judge. Today the police are going to show their side. However, even before today’s hearing, Muralidhar has been appointed judge of the Punjab-Haryana High Court overnight. Suddenly go Muralidhar’s transfer has sparked churches. Therefore, today’s hearing in the Delhi High Court has taken everyone’s attention.

 

Web Title: Story Delhi violence high court justice S Muralidhar transfer today High Court hearing on Delhi Violence.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#india(222)#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x