15 January 2025 3:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: IREDA Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO Quant Mutual Fund | पगारदारांनो, टॅक्स वाचेल आणि पैसा 3 ते 4 पटीने वाढेल, ही म्युच्युअल फंड योजना मालामाल करेल IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड सह डिटेल्स नोट करा, कमाईची संधी सोडू नका 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी
x

दिल्ली हिंसाचाराचं आयसिस कनेक्शन? काश्मीरच्या दाम्पत्याला अटक

ISIS Connection, Delhi Violence

नवी दिल्ली: अफगाणिस्तानमधील इस्लामिक स्टेट इन खोरासन प्रॉव्हिन्स (आयएसकेपी) या संघटनेशी संलग्नित असलेल्या काश्मीरच्या एका जोडप्याला दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आयएसकेपीच्या संघटनेतील काही लोकांसोबत मिळून दिल्लीत सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधातील आंदोलन भडकवण्यामागे या दाम्पत्याचा हात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. केंद्रीय गुप्तचर संस्थांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर एका खास मोहिमेअंतर्गत या दाम्पत्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

दरम्यान, या दोघांना १७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. जहानजेब सामी आणि हिना बशीर बेग असं या दाम्पत्याचं नाव असून त्यांचा संबंध आयसिसच्या खुरासान मॉड्यूलशी असल्याचा पोलिसांना संशय आहे. हे दाम्पत्य सीएएविरोधी आंदोलन भडकवण्याचं काम करत असल्याचा संशयही पोलिसांनी व्यक्त केलाय. तसंच दिल्लीत हल्ल्या करण्याचा त्यांचा मनसुबा असल्याचंही सांगण्यात येतंय.

दिल्ली पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दोन्ही पती-पत्नी असून ‘इंडियन मुस्लिम यूनाइट’ नावाने एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म चालवत होते. CAA, NRC विरोधी आंदोलनात जास्तीत जास्त लोकांना सहभागी करुन घेण्याचा त्यांचा हेतू होता. अटक करण्यात आलेल्या दाम्पत्याचा इस्लामिक स्टेट इराक अँड सीरिया (आयएसआयएस) या दहशतवादी संगटनेशी संबंध असल्याची माहिती मिळाली आहे. दोन्ही ऑगस्ट-2019 पासून दिल्लीत राहत आहे. दाम्तत्याकडे आक्षेपार्ह दस्ताऐवज देखील आढळून आले आहेत. जहानजेब सामी हा दिल्लीतील एका खासगी कंपनीत काम करत होता. पोलिस दोघांची कसून चौकशी करत आहे.

 

News English Summery: Shocking details have been surfaced about the ongoing agitation against the CAA in Delhi. Delhi Police suspect that the movement is linked to Isis International terrorist organization. Police suspect a couple belonging to the union. A couple has been arrested from Jamianagar in Okhala, Delhi Police Vice President Pramod Singh Kushwaha said. The two have been remanded in police custody till March 17. Police suspect that the couple was identified as Jahanzeb Sami and Hina Bashir Beg, who are linked to Isis’ Khurasan module. Police also suspect that the couple was working to arouse agitation against CAA. It is also said that he intended to carry out attacks in Delhi.

 

Web News Title: Story Delhi violence police suspect couple ISIS connection.

हॅशटॅग्स

#Delhi(14)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x