माजी सरन्यायाधीशांच्या राज्यसभेवरील नेमणुकीवरून सर्वच थरातून टीका...पण का?
नवी दिल्ली, १७ मार्च: सुप्रीम कोर्टाचे माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांची राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राज्यसभेसाठी निवड केलीय. राज्यसभेतले १२ खासदारांची शिफारस राष्ट्रपतींना करता येते. गोगोईंनी ३ ऑक्टोबर २०१८ रोजी सरन्यायाधीश पदाचा कार्यभार स्वीकारला. जवळपास १३ महिने त्यांनी सरन्यायाधीश म्हणून काम केलं.
तत्पूर्वी जानेवारी २०१८ मध्ये सुप्रीम कोर्टाच्या चार सर्वात वरिष्ठ न्यायाधीशांनी एक ऐतिहासिक पाऊल उचलले होते. त्यांनी तातडीने एक पत्रकार परिषद घेत तत्कालीन सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्यावर कामाच्या पद्धतीवर अनेक प्रश्न उपस्थित करीत न्यायव्यवस्था धोक्यात असल्याचे म्हटले होते. या न्यायाधीशांमध्ये न्या. रंजन गोगोई, न्या. लोकूर, न्या. चेलमेश्वर आणि न्या. कुरियन जोसेफ यांचा सहभाग होता. त्यानंतर रंजन गोगोई सरन्यायाधीश झाले आणि त्यांच्याच काळात राफेल प्रकरणात मोदी सरकारला क्लीनचिट मिळण्याचा निर्णय झालं, तसेच राम मंदिर उभारण्याचा निर्णय देखील त्यांनी स्वतःचा कार्यकाळ संपण्याच्या १-२ दिवस आधी दिला होता.
मात्र, आता सुप्रीम कोर्टातील गोगोई यांचे सहकारी न्या. मदन लोकूर यांनी यावर तिखट शब्दांत टिपण्णी केली आहे. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भात वृत्त दिले आहे. न्या. लोकूर यांनी म्हटले की, “माजी सरन्यायाधीश गोगोई यांना आत्ता जो सन्मान मिळाला आहे, त्याची चर्चा आधीपासूनच सुरु झाली होती. त्यातच त्यांना उमेदवारी मिळणं हे आश्चर्यचकीत करणारं नाही. मात्र, हे अगदीच लवकर झालं हे आश्चर्यकारक आहे. ही बाब न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य, निष्पक्षता आणि अखंडतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित करतं.” आता शेवटचा स्तंभ देखील कोसळला का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, गोगोई यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीवर भाष्य करण्यास न्या. चेलमेश्वर यांनी भाष्य करण्यास नकार दिला आहे.
त्यानंतर पत्रकार तसेच राजकीय नेत्यांकडून यावर टीका करण्यास सुरुवात झाली आहे. काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी ट्विट करत केंद्रीय मंत्री निती गडकरी आणि दिवंगत नेते अरुण जेटली यांच्या एका जुन्या वक्तव्याची आठवण करून दिलीय. यामध्ये त्यांनी, ‘निवृत्तीनंतर काम मिळवण्याच्या नादात न्यायपालिकेचं स्वातंत्र्य प्रभावित होत असल्याचं’ म्हटलं होतं.
भाजपचे माजी नेते यशवंत सिन्हा यांनीही ‘माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई राज्यसभेचं पद अस्वीकार करतील, अशी मला आशा आहे. अन्यथा ते न्यायपालिकेच्या प्रतिष्ठेला नुकसान पोहचवतील’ असं सिन्हा यांनी म्हटलंय.
I hope ex-cji Ranjan Gogoi would have the good sense to say ‘NO’ to the offer of Rajya Sabha seat to him. Otherwise he will cause incalculable damage to the reputation of the judiciary.
— Yashwant Sinha (@YashwantSinha) March 16, 2020
मा. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई साहेब यांनी सरकारच्या बाजूने अनेक निर्णय दिले. बक्षिस काय मिळाले तर राज्यसभेवर निवडून दिले. आता समाजाने ठरवायचेय, गोगोई साहेब की मुरलधीर !
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) March 17, 2020
एप्रिल २०१९ मध्ये तत्कालीन मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने निवृत्त न्यायाधीशांना महत्त्वाच्या जागांवर नेमल्याने न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य धोक्यात येते असे म्हटले होते.
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) March 17, 2020
News English Summery: Former Supreme Court Chief Justice Ranjan Gogoi has been elected by President Ram Nath Kovind to the Rajya Sabha. The 12 members of the Rajya Sabha can be recommended to the President. Gogoi accepted the post of Chief Justice on October 3, 2018. He served as the Chief Justice for about 13 months. Earlier in January 2018, the four most senior judges of the Supreme Court took a historic step. He had taken a press conference immediately, raising questions on the mode of work against the then Chief Justice of Deepak Mishra, saying the judiciary was in danger. Take it to the judges. Ranjan Gogoi, justice Lokur, Justice Chelmeshwar and Justice. Kurien Joseph was involved. Then Ranjan Gogoi became the Chief Justice and in his time, the Modi government decided to get a clean chit in the Rafale case, and also decided to set up a Ram temple 1-2 days before the end of his term. Since then, journalists and political leaders have started criticizing it. Congress MP Shashi Tharoor tweeted, reminding him of an old statement of Union Minister Nitish Gadkari and late leader Arun Jaitley. In this, he said, ‘The independence of the judiciary is affecting the retirement work.’ Former BJP leader Yashwant Sinha also said, “I hope that former chief Justice of india Ranjan Gogoi will reject the post of Rajya Sabha.” Otherwise, they will harm the reputation of the judiciary, “said Sinha.
News English Title: Story former Chief Justice of India Ranjan Gogoi reaction on Rajyasabha nomination News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- FASTag Alert | तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, अत्यंत महत्त्वाची अपडेट, या तारखेपासून नवा नियम, मोठा दंड भरावा लागेल
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- Loan EMI Alert | कर्जबाजारी होण्यापासून वाचायचं असेल तर वर्षाच्या सुरुवातीपासूनच घ्या योग्य काळजी, या टिप्स फॉलो करा
- Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईस अजून घसरणार की तेजी येणार - NSE: SUZLON
- TECNO POP 9 5G | टेक्नो POP 9 5G स्मार्टफोनची बाजारात दमदार एन्ट्री, किंमत केवळ 10,999 रुपये आणि जबरदस्त फीचर्स
- SBI Salary Account | पगारदारांनो, SBI बँकेत सॅलरी अकाउंट ओपन करा, फ्री इन्शुरन्ससहित मिळतील अनेक फायदे