15 January 2025 1:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Quant Mutual Fund | पगारदारांनो, टॅक्स वाचेल आणि पैसा 3 ते 4 पटीने वाढेल, ही म्युच्युअल फंड योजना मालामाल करेल IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड सह डिटेल्स नोट करा, कमाईची संधी सोडू नका 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरबाबत मोठे संकेत, तज्ज्ञांकडून SELL रेटिंग, नेमकं कारण काय - NSE: NTPCGREEN HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा
x

विरोधक लवकरच माझं स्वागत करतील: खासदार रंजन गोगोई

MP Ranjan Gogoi, Supreme Court, Rajya Sabha

नवी दिल्ली, १९ मार्च: माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी गुरुवारी राज्यसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली. दोन दिवसांपूर्वीच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रंजन गोगोई यांची राज्यसभेवर नियुक्ती केली होती. रंजन गोगोई यांच्या नियुक्तीवरून काँग्रेसने केंद्र सरकारवर जोरदार टीका केली होती. गुरुवारी याच विरोधाचा भाग म्हणून काँग्रेस आणि बहुजन समाज पक्षाच्या राज्यसभेतील खासदारांनी शपथविधीवेळी सभात्याग केला. कम्युनिस्ट पक्ष, डीएमके आणि एमडीएमकेनेही या नियुक्तीला विरोध केला आहे.

दरम्यान, शपथविधीच्या वेळी काँग्रेसच्या खासदारांनी राज्यसभेत शेम-शेमच्या घोषणा दिल्या. यावेळी रंजन गोगोई यांनी दिलेलं उत्तर सध्या राजकीय वर्तुळात चांगलंच गाजत आहे. जेव्हा त्यांना विरोध करण्यात आला तेव्हा ते म्हणाले की, ‘लवकरच ते माझं स्वागत करतील’. त्यांचा तो आत्मविश्वास पाहून अनेकांनी त्यांचा कौतुक केलं. काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी गोगोई यांच्या नियुक्तीला न्यायपालिकेच्या स्वातंत्र्यावर हल्ला म्हणत टीका केली जात आहे. सोमवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राज्यसभेतील सदस्यपदासाठी गोगोईंचे नाव ठरविले होते.

रंजन गोगोई यांच्या नियुक्तीवर सर्वोच्च न्यायालयातील माजी न्यायाधीशांनी टीका केली होती. माजी न्यायाधीश मदन लोकूर, ए के पटनाईक, कुरिअन जोसेफ यांनी या नियुक्तीबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. त्याचवेळी स्वतः रंजन गोगोई यांनी आपल्या नियुक्तीचे समर्थन केले आहे. कायदे मंडळ आणि न्याय मंडळाने यांनी एकत्र मिळून काम केले पाहिजे, यासाठीच मी ही जबाबदारी स्वीकारली असल्याचे रंजन गोगोई यांनी सांगितले.

 

News English Summery: Former Chief Justice Ranjan Gogoi administered the oath of office to the Rajya Sabha on Thursday. At this time, the Congress MPs announced Shem-Shem in the Rajya Sabha. At this time, the answer given by Ranjan Gogoi is currently playing well in the political circles. When they were opposed, they said they would welcome me soon. Many appreciated his confidence. Gogoi’s appointment is being criticized by other opposition parties, including the Congress, calling it an attack on the independence of the judiciary. On Monday, President Ram Nath Kovind had nominated Gogoi for the post of Rajya Sabha member. Former Chief Justice of India (CJI) Ranjan Gogoi administered oath to various opposition members in the Rajya Sabha on Thursday. Other members, including Congress, protested and went out of the House. As the proceedings of the Senior House began, the opposition members started shouting as soon as Gogoi reached the designated place for the oath. Speaking on this objection, Chairman M.K. Venkaiah Naidu said that it is not appropriate that we should respect the members.

 

News English Title:  Story former CJI Ranjan Gogoi takes oath as Rajya Sabha MP opposition stages walkout News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Supreme Court(138)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x