22 February 2025 4:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Credit Card EMI | क्रेडिट कार्डच्या मोठ्या बिलाचे EMI मध्ये रूपांतर कसे करावे? थकीत रक्कम भरणे सोपे होईल Numerology Horoscope | नशीब आणि आकड्यांचा खेळ, अंकज्योतिषशास्त्रानुसार 16 फेब्रुवारी तुमचा रविवारचा दिवस कसा असेल IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी होईल मोठी कमाई, अशी संधी सोडू नका - IPO Watch SBI Home Loan | SBI बँकेतून 25 लाखांचे होम लोन 15 वर्षांसाठी घेतले तर, किती रुपयांचा मासिक EMI भरावा लागेल, येथे पहा Smart Investment | पगारदारांनो, पैसे बँकेत ठेऊन वाढत नसतात, या योजनेत महीना 5000 रुपये बचत देईल 2.5 कोटी रुपये परतावा Improve Credit Score | प्रत्येक बँक कर्ज देण्यास टाळाटाळ करतेय, करा केवळ एक काम, मिनिटांत मिळेल कर्ज Home Loan Charges | 90 टक्के पगारदारांना माहित नाही, बँकेतून गृह कर्ज घेताना कोणकोणते चार्जेस वसूल केले जातात
x

LG Polymers: विशाखापट्टणममध्ये गॅस गळती, ७ जणांचा मृत्यू, ५००० जणांवर उपचार सुरू

Andhra Pradesh, Gas Leak, LG Polymers

विशापट्टणम, ७ मे: विशाखापट्टणमच्या पॉलिमर कंपनीत (LG Polymers) झालेल्या विषारी वायूच्या गळतीमुळे गुरुवारी सहा जणांचा मृत्यू झाला. विशाखापट्टण शहरालगत असणाऱ्या गोपालापट्टण परिसरात ही कंपनी आहे. सरकारकडून लॉकडाऊनचे निर्बंध शिथील करण्यात आल्यानंतर आज पहाटे ही कंपनी (LG Polymers) पुन्हा सुरु करण्यात आली. त्यावेळी काही कामगार प्लांट सुरु करण्याच्या तयारीत होते. तेव्हा अचानकपणे विषारी वायूच्या गळतीला सुरुवात झाली. यामुळे अनेक कामगार जागीच बेशुद्ध पडायला सुरुवात झाली. आतापर्यंत साधारण १७० जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून २० जण गंभीर आहेत. या विषारी वायूमुळे तीन किमीच्या परिसरावर प्रभाव पडला असून आतापर्यंत एकूण ५ गावांमधील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

पोलिसांनी यापरिसरासोबत ५ गावं पूर्णपणे सील केला आहे. दरम्यान गॅस वेगानं पसरत असल्यानं 3 किलोमीटरपर्यंत परिसरात राहणाऱ्या लोकांना त्रास झाला आहे. ही गॅस गळती कशामुळे झाली याचं कारण अद्याप समोर येऊ शकलं नाही. कोरोनाचं संकट असताना आता गॅस गळतीच्या या दुर्घटनेमुळे विशाखापट्टणम हादरलं आहे.

जिल्हा शल्य चिकित्सक व आरोग्य अधिकारी (डीएमएचओ) यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. विषारी वायू गळतीमुळे परिसरातील नागरिकांना डोळ्यांमध्ये जळजळ व श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला होता. यानंतर अनेकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी अग्निशम विभागाचे वाहन, रुग्णवाहिका व पोलीस दाखल झाले आहेत.

 

News English Summary: K in Andhra Pradesh. R. R. A major accident has taken place in Venkatapuram village due to a gas leak in the LG Polymers Industrial Building. Visakhapatnam is shaken by gas leak. Shockingly, the gas leak killed seven people and affected more than 5,000 people and animals. The three are in critical condition and have been placed on a ventilator.

News English Title: Story gas leak at LG Polymers chemical plant in Andhra Pradesh 5 dead 120 hospitalized News latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x