22 April 2025 6:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRB Share Price | आयआरबी शेअर्स गुंतवणूकदारांसाठी महत्वाची अपडेट, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: IRB Reliance Power Share Price | शेअर प्राईस 43 रुपये; रिलायन्स पॉवर शेअर्सबाबत फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Apollo Micro Systems Share Price | तगडा परतावा मिळेल, हा डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार - NSE: APOLLO Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार बुधवार 23 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IRFC Share Price | 433 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा देणाऱ्या शेअरसाठी अपसाईड टार्गेट प्राईस - NSE: IRFC NBCC Share Price | 4 रुपयांचा शेअर 101 रुपयांवर आला, जबरदस्त तेजीत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: NBCC Vikas Lifecare Share Price | शेअर प्राईस 2 रुपये 66 पैसे, पेनी स्टॉक जबरदस्त तेजीत, टार्गेट नोट करा - NSE: VIKASLIFE
x

मागच्या १४ दिवसात ७८ जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा एकही नवा रुग्ण नाही - आरोग्य मंत्रालय

Corona Crisis, Covid 19

नवी दिल्ली, २३ एप्रिल: सध्या कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देश चिंतेमध्ये आहे. एकाबाजूला करोनाची लागण झालेल्या रुग्णांची वाढती संख्या तर दुसऱ्याबाजूला अर्थव्यवस्था ठप्प असल्याने रोजगाराची चिंता. देश अशा दुहेरी संकटाचा सामना करत असताना एका दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. भारतातील ७८ जिल्ह्यात मागील १४ दिवसांत एकही कोरोना विषाणू बाधित रुग्णाचे प्रकरण समोर आले नसल्याची माहिती, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी दिली. यामध्ये ९ राज्याती ३३ नव्या जिल्ह्यांचा समावेश असल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, देशातील लॉकडाऊनला एक महिना पूर्ण झाला आहे. आरोग्य मंत्रालयानुसार या विषाणूविरोधातील लढ्यात देश सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. टेस्टिंगची संख्या वाढवण्यात आली आहे. आतापर्यंत पाच लाखांहून अधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर पीपीई किटसह व्हेंटिलेटर आणि कोविड समर्पित रुग्णालयांची संख्याही वाढवण्यात आली आहे.

आयसीएमआरने गुरुवारी सकाळी ९ वाजेपर्यंत देशात कोरोनाच्या एकूण ५,००,५४२ चाचण्या झाल्याची माहिती दिली. आयसीएमआरने म्हटले की, एकूण ४,८५,१७२ व्यक्तींचे परीक्षण करण्यात आले आहे. त्यात गुरुवारी सकाळपर्यंत २१,७९७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

दरम्यान देशातील वेगवेगळया राज्यांमध्ये मोठया प्रमाणावर कोरोनाच्या चाचण्या सुरु आहेत. त्यामुळे नेमकी किती लोकांना करोनाची लागण झाली आहे ते समोर येत आहे. मागच्या २४ तासात देशात १४०९ नागरिकांचे करोना चाचणीचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्याच्या घडीला देशात एकूण २१,३९३ करोनाग्रस्त रुग्ण आहेत. आरोग्य मंत्रालयचे सहसचिव लव अग्रवाल यांनी ही माहिती दिली.

 

News English Summary: Currently the whole country is concerned about the corona virus. On the one hand, the growing number of patients infected with the corona, on the other hand, the worries of employment due to the stagnation of the economy. As the country faces such a double whammy, there is some comforting news. No case of corona virus has been reported in 78 districts of India in the last 14 days, the Union Health Ministry said on Thursday. It also includes 33 new districts in 9 states, he said.

News English Title: Story Good News in 78 Districts of India no any fresh corona positive cases found in last 14 days news latest updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या