गुजरात: २००२ मधील नरोदा पाटिया दंगलीच्या खटल्यातील न्यायाधीशांची बदली
अहमदाबाद: २००२ च्या नरोदा पाटिया दंगली प्रकरणाची सुनावणी घेणारे विशेष एसआयटी न्यायाधीश एम. दवे यांची गुजरात उच्च न्यायालयाच्या आदेशाने वलसाडचे मुख्य जिल्हा न्यायाधीश म्हणून त्यांची बदली झाली आहे. शुक्रवारी गुजरात उच्च न्यायालयाने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार एम. दवे यांची वलसाड जिल्ह्यातील प्रधान न्यायाधीश म्हणून बदली झाली आहे.
गुजरातमधील नरोडा पाटिया येथे २००२ मध्ये उसळलेल्या दंगली प्रकरणी गुजरात हायकोर्ट येथे खटला सुरु होता. या प्रकरणात दोषी ठरलेल्या ३२ जणांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्यात गुजरातच्या माजी मंत्री माया कोडनानी यांचा देखील समावेश असून त्यांना कनिष्ठ न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. देशभरात खळबळ उडवून देणारे हे प्रकरण नेमके आहे तरी काय याचा घेतलेला हा आढावा.
नरोडा पाटियामध्ये झालेल्या दंगलीत ११ जणांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी माया कोडनानी गुजरात सरकारमध्ये महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री होत्या. माया कोडनानी या दंगलीच्या सूत्रधार होत्या, असा ठपका कोर्टाने ठेवला आहे. याआधी झालेल्या या खटल्याच्या सुनावणीत कोडनानी यांनी साक्षीदार म्हणून अमित शहा यांना हजर करण्यासाठी कोर्टाकडे वेळ मागितला होता.
त्यावेळी भाजपाचे अध्यक्ष अमित शहा आपल्या बाजूने साक्ष देणार असल्याचा दावा त्यांनी केला होता. अमित शहा त्यांच्या कामात जास्त व्यस्त असतात. मला अजूनपर्यंत त्यांच्या घरचा पत्ता मिळालेला नाही. त्यामुळे साक्षीदार म्हणून कोर्टात हजर राहण्यासाठीचं समन्स त्यांच्यापर्यंत पोहोचवता आलेलं नाही, असं कोडनानी त्यांनी सांगितलं होतं. कोडनानी यांची विनंती मान्य करत कोर्टाने शहांना साक्षीदार म्हणून कोर्टात हजर राहण्याचे समन्स बजावले होते. त्यानंतर १८ सप्टेंबर २०१७ रोजी अमिता शहा कोर्टात हजर झाले होते. त्यावेळी अमित शहा यांनी कोडनानी यांच्या बाजूने साक्ष दिली होती.
Gujarat: BJP President Amit Shah appears before a sessions court in Ahmedabad as Maya Kodnani’s witness in 2002 Naroda Gam riots case. pic.twitter.com/iWkgMQXndl
— ANI (@ANI) September 18, 2017
Maya Kodnani was not present in Naroda Gam, she was inside the state assembly at 8.30 am: Amit Shah in court
— ANI (@ANI) September 18, 2017
नेमके काय झाले नरोडा पाटियात?
अहमदाबाद शहराच्या सीमेवर असलेल्या नरोडा पाटिया उपनगरात गोध्रा हत्याकांडानंतर उसळलेल्या दंगलीत ९७ मुस्लिमांचा मृत्यू झाला होता. यात ३३ जण जखमी झाले होते.
कधी घडली घटना?
२८ फेब्रुवारी २००२ रोजी हा नरसंहार झाला होता. २७ फेब्रुवारी २००२ रोजी गोध्रा येथे साबरमती एक्स्प्रेसचे डबे जाळल्याने कारसेवकांचा मृत्यू झाला. या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी विश्व हिंदू परिषदेने २८ फेब्रवुारी रोजी बंदची हाक दिली. याच दिवशी जमावाने नरोडा पाटीयातील मुस्लिमांच्या वस्तीवर हल्ला केला. या हल्ल्यात ९७ जणांची हत्या करण्यात आली.
News English Summery: Special SIT Judge MK Dave who is hearing the 2002 Naroda Patiya riots case. Dave has been transferred as the Chief District Judge of Valsad on the orders of the Gujarat High Court. According to a notification issued by the Gujarat High Court on Friday, M.K. Dave has been transferred as the Chief Justice of Valsad district. The Gujarat High Court is facing trial in the 2002 riots in Naroda Patiya in Gujarat. The 32 accused in the case had filed a petition in the High Court. They include former Gujarat minister Maya Kodnani, who was sentenced to life imprisonment by a junior court. This is an overview of what is causing the uproar across the country.
News English Title: Story Gujarat Judge 2002 Naroda Gam riot transferred as per order of Gujarat High Court.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC
- Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO
- IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC