15 January 2025 10:29 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | म्युच्युअल फंड असावा तर असा, बिनधास्त गुंतवणूक करा, मिळेल करोडोत परतावा Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉकमध्ये तुफान तेजीचे संकेत, कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Personal Loan | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार योग्य आहे का, इथे जाणून घ्या योग्य माहिती, कर्ज घेण्यास सोपे जाईल Reliance Power Share Price | 39 रुपयाच्या पॉवर शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RPOWER Yes Bank Share Price | येस बँक शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, बँकेबाबत फायद्याची अपडेट, रिपोर्ट जारी - NES: YESBANK EPFO Passbook | पगारदारांसाठी EPFO ची नवीन सेवा, EPF रक्कम लवकरात लवकर काढता येणार, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी स्टॉक तेजीत, गुंतवणूकदारांची मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2025
x

९६० तबलीगी परदेशी नागरिकांचे पर्यटन व्हिसा रद्द; काळ्या यादीत समावेश

Corona crisis, Covid 19, Tablighi Jamaat Nizamuddin

नवी दिल्ली, २ एप्रिल: दिल्लीतील निजामुद्दीन परिसरातील तबलीगी समाजाच्या मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात सहभागी झालेल्या ९६० परदेशी नागरिकांना काळ्या यादीत घालण्यात आले असून त्यांचा पर्यटन व्हिसा रद्द करण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने यासंदर्भात माहिती दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनची परिस्थिती असताना नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी संबंधितांवार परदेशी कायद्याअंतर्गत कारवाई करण्याचे आदेशही दिल्ली पोलिसांना देण्यात आले आहे.

१८ मार्चला निझामुद्दीनमध्ये तबलिगी जमातीच्या मरकजचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये शेकडो तबलिगी सहभागी झाले होते. यातील काही जणांना कोरोना झाल्याचं समोर आलं. मरकजनंतर बरेचसे तबलिगी देशभरातील त्यांच्या राज्यांमध्ये परतले. मरकजमध्ये सहभागी होण्यासाठी काही तबलिगी पर्यटन व्हिसावर परदेशातून आले होते. पर्यटन व्हिसावर भारतात येणाऱ्या व्यक्तींना धार्मिक कार्यक्रमात सहभागी होता येत नाही. त्यासाठी दुसऱ्या प्रकारचा व्हिसा आवश्यक असतो.

 

News English Summary: 960 foreign nationals who participated in the program held at the headquarters of the Tabligi community in the Nizamuddin area of ​​Delhi have been blacklisted and their tourist visas canceled. The Union Home Ministry informed about this. In the wake of the lock down in the backdrop of Corona, Delhi Police has also been directed to take action under a foreign law on violating the rules.

 

News English Title: Story in the case of Tablighi Jamaat Nizamuddin 960 foreigners have been blacklisted and their tourist visa cancelled says office of the Union Home Minister Amit Shah News latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x