22 November 2024 5:11 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

चिंता वाढली! देशात १२ तासात २४० कोरोनाग्रस्त वाढले आहेत

Corona Crisis, Covid 19

नवी दिल्ली, ०१ एप्रिल: देशात १२ तासात २४० कोरोनाग्रस्त वाढले आहेत, त्यामुळे कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या आता १६३७ वर गेली आहे. तर आत्तापर्यंत ३८ जणांचा मृत्यू झाला आहे. देशाच्या दृष्टीने ही अतिशय चिंता वाढवणारी बातमी आहे. दरम्यान १६३७ रुग्णांपैकी १३३ जण बरे झाले आहेत अशीही माहिती मिळते आहे. केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने ट्विट करुन ही माहिती दिली आहे. काल रात्रीपर्यंत रुग्णांची संख्या १३९७ होती. मात्र मागील १२ तासात २४० ने ही संख्या वाढली आहे.

दुसरीकडे गेल्या दोन दिवसात मुंबई आणि आसपासच्या परिसरात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर सापडले आहेत. त्यामुळे या रुग्णांचे वास्तव्य असलेल्या परिसरात कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. काल वरळी कोळीवाडा येथील परिसरात कोरोनाचे काही संशयित सापडल्यानंतर हा परिसर सील करण्यात आला होता. तर गोरेगावमधील बिंबिसारनगर हा परिसरसुध्दा कोरोनाचे दोन रुग्ण सापडल्यानंतर लॉक करण्यात आला होता. दरम्यान, मुंबईत आतापर्यंत सुमारे १४० रहिवासी भाग सील करण्यात आले आहेत. मुंबईप्रमाणेच ठाणे, डोंबिवली, नवी मुंबई आणि वसई-विरार या शहरातील काही भागसुद्धा सील करण्यात आले आहेत.

 

News English Summary: The country has grown to 240 coroners in 12 hours, so the total number of coronary cases has now increased to 1637. So far 38 people have died. This is very worrying news for the country. Meanwhile, 133 out of 1637 patients are reported to have recovered. The central government’s health and family welfare ministry has tweeted this information. The total number of patients till last night was 1397. However, the number has increased by 240 in the last 12 hours.

 

News English Title: Story increase of 240 Covid19 cases in the last 12 hours total number of positive cases rise to 1637 in India News latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x