26 November 2024 2:36 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ladki Bahin Yojana | सरकारकडून लाडक्या बहिणींना देण्यात येणार रिटर्न गिफ्ट, आता 2100 रुपये मिळणार - Marathi News Salary Management | बचतीचा महामंत्र, तुमचा सुद्धा पगार हातात आल्याबरोबर गायब होतो, या ट्रिक्स फॉलो करा, फायदा घ्या Penny Stocks | 7 रुपयाचा शेअर श्रीमंत करणार, 5 दिवसात 26.54% परतावा दिला, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: DIL Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरमध्ये तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, कन्फर्म तिकीट कॅन्सल झाल्यानंतर किती चार्जेस द्यावे लागतात - Marathi News IRB Infra Share Price | IRB इन्फ्रा शेअर फोकसमध्ये, तुफान तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेजिंग - NSE: IRB SJVN Share Price | SJVN कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: SJVN
x

देशात कोरोना रुग्णांचा आकडा २३ हजार पार

Covid 19, Corona Crisis

नवी दिल्ली, २४ एप्रिल: भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा हा २३ हजार पार गेला आहे. आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या ताज्या माहितीनुसार शुक्रवार सकाळपर्यंत देशात कोरोना विषाणू बाधितांची संख्या ही २३ हजार ७७ वर पोहोचली. यापैकी १७ हजार ६१० रुग्ण हे कोरोना विषाणूच्या संसर्गावर उपचार घेत आहेत. तर ४ हजार ७४९ रुग्ण हे बरे झाले आहेत किंवा त्यांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. तर आतापर्यंत ७१८ जणांनी आपले प्राण गमावले आहेत.

आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार २४ तासांत देशात १६८४ नवे रुग्ण समोर आले आहेत तर ३७ जणांचा मृत्यू झाला आहे. जगभरातल्या आकडेवारीचा विचार करायचा झालाच तर गेल्या २४ तासांत जगभरात कोरोनामुळे ४ हजार ५०० लोकांनी आपला प्राण गमावला आहे, त्यामुळे शुक्रवार सकाळपर्यंत संपूर्ण जगात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ही १ लाख ८६ हजार ४६२ वर पोहोचली आहे. तर एफपी वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार जगात २४ तासांत ६८ हजार १७ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली आणि राज्यस्थानसारख्या मोछ्या राज्यात करोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. करोनानं भारतात शिरकाव केल्यानंतर सर्वाधिक रूग्ण असलेल्या केरळ राज्यानं देशांसमोर आदर्श ठेवला आहे. कमी लोकसंख्या असणारी भारतातील ३ राज्य कोरोनामुक्त झाले असून गोवा, मणिपूर आणि त्रिपुरा या राज्यांनी कोरोनाशी दोन हात करून आपल्या राज्याला कोरोना फ्री केलं आहे. मात्र देशातील एकूण आकडेवारी पाहता केंद्रीय आरोग्य मंत्रालय जरा घाई करतंय असंच तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

दरम्यान, डॉ. गुलेरिया यांच्या म्हणण्यानुसार, करोनाची लागण झालेल्या रुग्णांवर यशस्वीपणे उपचार करता येतात. रुग्णांपैकी ८० टक्के रुग्णांना केवळ काळजी घेण्याची गरज असते. तर, २० टक्के रुग्णांना विशेष काळजी घेण्याची आवश्यकता असते आणि केवळ ५ टक्के रुग्णांनाच व्हिंटिलेटरची आवश्यकता असते. १५ टक्के अतिशय गंभीर असलेल्या रुग्णांना व्हेंटिलेटर्सऐवजी अधिकच्या ऑक्सिजन सपोर्टची गरज असते आणि सरकारने हे लक्षात घेऊनच पावले उचललेली आहेत.

 

News English Summary: According to the health ministry, 1684 new cases have been reported in the country in the last 24 hours and 37 people have died. As many as 4,500 people have lost their lives to corona in the last 24 hours worldwide, bringing the total number of corona deaths worldwide to 1,86,462 as of Friday morning. According to the FP news agency, 68,017 new patients have been registered in the world in 24 hours.

News English Title: Story India Covid 19 cases crossed 23 Thousand mark News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x