21 November 2024 11:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

भारताकडे ३.२८ कोटी हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषधांचा साठा; केंद्रीय आरोग्य मंत्रालय

Covid19, Corona Crisis, hydroxychloroquine tablets

नवी दिल्ली, १० एप्रिल : भारताने भूतान, बांगलादेश, अफगाणिस्तान, नेपाळ, म्यानमार, सेशेल्स, मॉरिशेस आणि अन्य आफ्रिकन देशांना औषधे पाठवली आहेत. मंगळवारी एअर इंडियाच्या विमानातून १० टन औषधे श्रीलंकेमध्ये पोहोचवण्यात आली. शेजारी देशांना पाठवलेल्या औषधांमध्ये पॅरासीटेमॉल आणि हायड्रोक्सी क्लोरोक्वाईनचा समावेश आहे. अमेरिका, स्पेन, ब्राझील, बहरीन, जर्मनी आणि यूके या देशांनी भारतीय औषध कंपन्यांबरोबर करार केले होते. Covid-19 वरील उपचारांसाठी या देशांना औषध निर्यात करण्यालाही भारत सरकारने मंजुरी दिली आहे.

दरम्यान, इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने नेमलेल्या कृतीगटाने अभ्यास करून ही नियमावली तयार केली आहे. सध्या कोरोना विषाणूबाधित रुग्णांना लवकर बरे करण्यासाठी हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन हे औषध देण्यात येत आहे. चीनमध्ये केलेल्या संशोधनानुसार हे औषध उपयुक्त ठरत असल्याचे समोर आले होते. हे औषध १५ वर्षांखालील मुलांना देऊ नये, असे नव्या नियमावलीत म्हटले आहे. त्याचबरोबर रेटिनोपथी आणि हायपरसेन्सिटिव्हीटी असणाऱ्या रुग्णांनाही हे औषध देऊ नये, असे सूचविण्यात आले आहे.

याच औषधांची देशांतर्गत उत्पादन क्षमता अधिक असली तरी सध्याच्या आणीबाणीच्या स्थितीत मात्र हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषधांबाबत असून एक बातमी समोर आली आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार देशात सध्याच्या घडीला ३.२८ कोटी हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषधांचा साठा आहे. त्यामुळे याची देखील चर्चा समाज माध्यमांवर रंगल्याचं पाहायला मिळत आहे.

 

News English Summary: Although the domestic production capacity of the drugs is high, in the current state of emergency, however, there has been a news report regarding hydroxychloroquine drugs. According to PTI news, the country currently has 3.28 crore hydroxychloroquine drug reserves. Therefore, it is also seen in the discussion on social media.

News English Title: Story India has stock of 3.28 crore hydroxychloroquine tablets says health ministry on India Covid19 News Latest updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x