22 November 2024 10:23 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS
x

लॉकडाउन परिणाम: भारतात डिसेंबरपर्यंत २ कोटी बाळांचा जन्म होईल - UNICEF चा अंदाज

Unicef, India, New Child Born, Lockdown

नवी दिल्ली, ८ मे: देशभरात करोनाचे ३३९० रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. २४ तासांमध्ये समोर आलेली ही संख्या आहे. त्यामुळे देशाची रुग्णसंख्या ही ५६ हजार ३४२ इतकी झाली आहे. तर मागील चोवीस तासात १३७३ रुग्ण बरे झाले आहेत. आत्तापर्यंत १६ हजार ५४० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सह सचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे.

भारतासह जगातील अनेक देशांनी कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. देशात १७ मे पर्यंत लॉकडाऊन घोषित केला आहे. सोशल डिस्टंसिंग, क्वारंटाईन यासारखे खबरदारीचे उपाय घेतले जात आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडाही वेगाने वाढत आहे.

दुसरीकडे, भारतात यावर्षी मार्च ते डिसेंबर या काळात सर्वाधिक २ कोटी मुलांचा जन्म होईल, असा अंदाज युनिसेफने वर्तवला आहे. ११ मार्च ते १६ डिसेंबर दरम्यान, जगभरात एकूण ११ कोटी ६० लाख मुलांचा जन्म होईल. यापैकी एकट्या भारतामध्ये २.१ कोटी, चीनमध्ये १.३५ कोटी मुलांचा जन्म होईल, असंही युनिसेफने नमूद केलं आहे. तसेच कोरोना संसर्गामुळे बाळाला जन्म देणाऱ्या आई आणि त्या बाळाला अनेक अडचणींचा सामनाही करावा लागेल, असाही इशारा युनिसेफने दिला.

युनिसेफने संयुक्त राष्ट्राच्या ‘वर्ल्ड पॉप्युलेशन डिव्हिजन २०१९ च्या अहवालातील माहितीनुसार हा अंदाज लावला आहे. सामान्यपणे बाळाचा गर्भ आईच्या पोटात जवळपास ९ महिने किंवा ४० आठवड्यांपर्यंत राहतो. याच निकषाचा वापर करुन युनिसेफने मुलांच्या जन्माच्या आकडीवारीचा अंदाज वर्तवला आहे.

 

News English Summary: According to UNICEF, India will give birth to a maximum of 20 million children between March and December this year. Between March 11 and December 16, a total of 116 million babies will be born worldwide. Of these, 2.1 crore will be born in India alone and 1.35 crore in China, according to UNICEF.

News English Title: Story International Unicef predict 2 crore birth of Child up to December in India News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x