कमलनाथ यांचा राजीनामा, काँग्रेसचं सरकार कोसळलं
भोपाळ, २० मार्च: मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी शुक्रवारी आपल्या पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. पत्रकारांनी त्यांनी ही माहिती दिली. राज्यपाल लालजी टंडन यांना भेटून त्यांच्याकडे राजीनामा देणार असल्याचे कमलनाथ यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. भाजपने षडयंत्र रचून आमचे सरकार पाडल्याचा आरोप कमलनाथ यांनी केला. काँग्रेसच्या २३ आमदारांचे राजीनामे याआधीच मध्य प्रदेश विधानसभेचे अध्यक्ष एन पी प्रजापती यांनी स्वीकारले आहेत. विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याआधीच कमलनाथ यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.
#MadhyaPradesh CM Kamal Nath: I have decided to tender my resignation to the Governor today. pic.twitter.com/jgaRf6F0K2
— ANI (@ANI) March 20, 2020
यावेळी बोलताना कमलनाथ म्हणाले, ‘आपण कोणत्याही खोट्या घोषणा केल्या नव्हत्या. भाजपाला १५ वर्ष मिळाले आणि मला १५ महिने मिळाले,’ असंही यावेळी त्यांनी सांगितलं. ‘सरकार अस्थिर करण्यासाठी भाजपाकडून वारंवार प्रयत्न केले जात आहेत असा आरोप त्यांनी केला. “आपल्या सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही आरोप नाही. भाजपाने कितीही अडथळे आणले तरी आम्हा विकासाच्या मार्गावर चालत राहणार. जनतेचा आमच्यावर विश्वास असून जनतेचं प्रमाणपत्र मिळेल. आम्हाला भाजपाच्या प्रमाणपत्राची गरज नाही,” असा टोलाही त्यांनी लगावला.
मध्य प्रदेशमधील काँग्रेसचे दिग्गज नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर ज्योतिरादित्य यांच्या समर्थक आमदारांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे राज्यातील काँग्रेस सरकार अडचणीत आलं आहे. फ्लोअर टेस्टची मागणी करत माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते शिवराज सिंह चौहान यांनी सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले होते. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने यावर निकाल देत शुक्रवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत कमलनाथ सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत.
News English Summery: Madhya Pradesh Chief Minister Kamal Nath on Friday decided to resign his post. He gave this information to journalists. Kamal Nath said he would meet Governor Lalji Tandon and resign from him. This time, he strongly criticized the BJP. Kamal Nath accused the BJP of plotting and demolishing our government. Madhya Pradesh Assembly Speaker NP Prajapati has already accepted the resignation of 23 Congress MLAs. Kamal Nath has decided to resign his position before proving the majority in the Assembly. Speaking on the occasion, Kamal Nath said, ‘You have not made any false declaration. BJP got 15 years and I got 15 months, ‘he said. He accused the BJP of repeated attempts to destabilize the government. “There is no allegation of corruption in our government. No matter what obstacles the BJP may face, we will continue on the path of development. We believe in the masses and people will get their certificates. We do not need BJP certification, ”he added.
News English Title: Story Kamal Nath resigns as Madhya Pradesh Chief Minister hours before trust vote deadline News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार